Kalicharan Maharaj  google
पुणे

"शिंदे साब बढीया काम कर रहे है", पुण्यात कालीचरण महाराजांची स्तुतीसुमने

सकाळ डिजिटल टीम

पुणे - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित असलेल्या कालीचरण महाराजांनी आज राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. पुण्यातील शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टकडून आयोजित म्हसोबा उत्सवाच्या दीप अमावस्येनिमित्त कार्यक्रमात कालीचरण महाराज उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. (Kalicharan Maharaj News in Marathi)

कालीचरण महाराज म्हणाले की, इथे येऊन खूप चांगलं वाटलं. आयोजकांनी खूप चांगलं कार्यक्रम घेतला. पुढच्या वर्षी अधिक प्रसन्नता वाटेल अशी आशा आहे. श्रावण सुरू झाला असून सगळ्यांनी शिवाची आराधना करावी, अस आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान सर्वांनी सुख-समृद्धी प्राप्त करून घ्यावी. तसेच हिंदू संस्कृतीच्या उत्थानासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवतार भूलोकावर येवो आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण करावे, अशी प्रार्थना शिवाच्या चरणी करावी असही कालीचरण महाराज म्हणाले.

राज्यातील हिंदुत्ववादी सरकारला आमचा पाठिंबा आहे. आता उद्धव ठाकरे यांना सल्ला देऊन काय फायदा असं म्हणतानाच कालीचरण महाराज यांनी ''शिंदे साब बढीया काम कर रहे है' असं म्हणत कौतुक केलं. त्यांनी दोन शहरांचं नामांतर केलं. वास्तविक पाहता ते नामांतर नसून पूर्वीची नावं त्यांनी शहराला दिल्याचं कालीचरण महाराज यांनी नमूद केलं. शिंदे सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

दरम्यान हिंदूंच्या अस्मितेचा विजय होईल, अशा राजांनी निरंतर सत्तेत बसाव. एकनाथ शिंदे यांना हार्दिक शुभेच्छा. मला आनंद आहे की शिंदे सरकार आलं. हिंदुत्ववादी लोकांनीच सत्तेत बसाव हा आमचा अजेंडा असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT