पुणे

काऱ्हाटीत पाच सिमेंट बंधाऱ्यांची कामे सुरू

CD

सुपे, ता. २ ः काऱ्हाटी (ता. बारामती) गावाला मिळालेल्या अटल भूजल योजनेच्या बक्षिसाच्या रकमेतून येथील ओढ्यांवर सुमारे दीड कोटी रुपये खर्चाच्या पाच सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना नुकतीच सुरुवात करण्यात आली. वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांच्या हस्ते नारळ फोडून जलसंधारणांच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
काऱ्हाटी गावाने अटल भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेत जिल्हा व राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दीड कोटींचे बक्षिस मिळवले आहे. या बक्षिसाच्या रकमेतून बंधाऱ्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. याआधी केलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे गावाची भूजल पातळी आजही समाधानकारक असल्याची माहिती येथील भूजल मित्रांनी दिली. अधिक पाणी लागणारी उसासारखी पिके कमी प्रमाणात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेतले आहे. त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. येथील तरुण शेतकरी कमी पाण्यावर येणारी पिके व फूल, फळशेतीकडे वळाले आहेत.
धोटे म्हणाले, ‘‘ग्रामस्थांची एकजूट चांगली असल्याने गावच्या परिसरात जलसंधारणांची चांगली कामे झाली. यापुढेही कामांचा दर्जा चांगला राहिल याकडे प्रमुख ग्रामस्थांनी लक्ष द्यावे. तरच निधीचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल. येथील ग्रामस्थ जलसंधारणांच्या कामांचा ठसा राज्यात उमटवतील अशी खात्री वाटते.’’
याप्रसंगी सहायक भूवैज्ञानिक हेमंतकुमार जगताप, सरपंच दीपाली लोणकर, मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ, उप कृषी अधिकारी प्रशांत मोरे, सहायक कृषी अधिकारी देविदास लोणकर, शिवराज चांदगुडे, जलसंपदा विभागाचे हृषीकेश पवार, वैभव भापकर आदींसह भूजल मित्र व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात पहिला नगरसेवक; भाजप उमेदवार मनिषा नागपुरे यांची बिनविरोध निवड

धक्कादायक! मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता, राज ठाकरे पोलिसांच्या संपर्कात, नेमकं काय घडतंय?

Shiv sena Pune Election: पुण्यात शिवसेनेची युती तुटली? १२३ जागांवर पक्ष स्वतंत्र लढणार? पडद्यामागे काय घडलं?

Sangli Election : ‘माघार घे, तुला कॉप्ट करतो! ’महापालिका निवडणुकीत नेत्यांचे नवे गाजर; सांगलीत ‘स्वीकृत’ राजकारण चर्चेत

Latest Marathi News Live Update : पुण्यात भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT