कोथरूड - मेट्रो आणि वाहतूक पोलिस प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या वाहतूक प्रयोगामुळे कर्वे रस्त्यावर दररोजच होणारी वाहतूक कोंडी.
कोथरूड - मेट्रो आणि वाहतूक पोलिस प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या वाहतूक प्रयोगामुळे कर्वे रस्त्यावर दररोजच होणारी वाहतूक कोंडी. 
पुणे

कर्वे रस्त्यावरील गर्दीत हरवतोय कोथरूडकर

सकाळवृत्तसेवा

कोथरूड - कर्वे रस्त्यावर वाहतूक पोलिसांच्या वतीने दररोज वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याने कामानिमित्ताने कर्वे रस्तामार्गे शहरात गेलेल्या नागरिकांना सायंकाळी घरी परतताना रोजच रस्ता शोधावा लागत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कर्वे रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने मेट्रो प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतुकीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना दररोजच नव्या रस्त्याने मार्गक्रमण करीत घराची वाट शोधावी लागते.

कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकात चक्राकार वाहतूक योजना, दुहेरी वाहतूक योजना हे प्रयोग झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून नळस्टॉपकडे जाणाऱ्या हलक्‍या वाहनांना एसएनडीटी महाविद्यालयमार्गे पुन्हा नळस्टॉप चौकाकडे वळसा घालायला लावणारी योजना सुरू केली आहे. यात भर म्हणजे पौड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत सायंकाळी बदल केला जातो. तर रात्री उशिरा पौड फाटा येथील उड्डाण पुलावरील वाहतूक बंद ठेवली जाते.

त्याचबरोबर म्हात्रे पुलाकडून कोथरूडकडे पाळंदे कुरिअरच्या गल्लीतून  जाणारी वाहतूक अनेकदा बंद ठेवण्यात येते. या सगळ्या प्रकारामुळे साहजिकच या परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडतो. परिणामी, कर्वे रस्त्यासह एरंडवणे भागातील गल्ली - बोळातील रस्तेही वाहतूक कोंडीमध्ये जाम होतात. अशावेळी दिवसभर कार्यालयीन कामकाजामुळे थकलेल्या नागरिकांना विविध वाहतूक योजनांचा मनस्ताप सहन करीत दररोज नवीन रस्ता शोधत घर गाठावे लागते.

नेहमी बदलणाऱ्या वाहतूक योजनांचा कंटाळा आला आहे. तसेच रस्त्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. खऱ्या अर्थाने आम्ही जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. मेट्रोचे काम लवकर पूर्ण करा. 
- अतुल गोंजारी, नागरिक

मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असली तरी प्रशासनाने दररोजच वाहतुकीत बदल करणे योग्य आहे का? या मानसिक त्रासातून सुटका कधी? 
- प्रमोदकुमार कुलकर्णी, नागरिक

नागरिकांना लवकर घरी पोचता यावे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न होत आहेत. दररोज सायंकाळी गरजेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत.
- प्रतिभा जोशी, वाहतूक पोलिस निरीक्षक, कोथरूड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT