kasbapeth-constituency
kasbapeth-constituency 
पुणे

Video : #कारणराजकारण : कमळ फुलविणाऱ्या कसब्यात प्रश्‍नांची दलदल 

सकाळ वृत्तसेवा

वार्तापत्र : कसबा मतदारसंघ 
सलग २५ वर्षे कमळ फुलविणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रश्‍नांची दलदल आजही कायम आहे. वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते अन्‌ आता पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नानेही तोंड वर करण्यास सुरवात केली आहे. अडचणी आणि प्रश्‍नांच्या या दलदलीतून कधी बाहेर पडणार, असा प्रश्‍न या मतदारसंघामधील मतदारांचा आहे.

१८ पेठा आणि १२ बुलतेदारांचा असलेला हा सुमारे तीन लाख मतदार असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाने शहराला पालकमंत्री आणि आता खासदार दिला. राजकीयदृष्ट्या सर्वाधिक जागृत असलेल्या मतदार येथे आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मतदारसंघामधून शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता आणि मंडई ते पुलगेट हे मुख्य रस्ते जातात. १९८७ च्या विकास आराखड्यात या मतदारसंघातील मुख्य रस्त्यांसह अनेक रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित केले होते. परंतु मतपेटीच्या राजकारणात आजही त्या रस्त्यांचे रुंदीकरण झाले नाही. परिणामी, मध्य भागात कायमच वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. 

शहरातील सर्वांत जुना चामडे बाजार, गूळ, भुसार, सरकी पेंड, पत्रा, प्लायवूड, सराफ आणि कपडे बाजार या मतदारसंघात येतो. महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, टिंबर मार्केटही येथेच आहे. बाजारपेठेचा परिसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची  ये-जा असते. 

शहरातील सर्वाधिक जुने वाडेही याच मतदारसंघात आहेत. गेल्या पाच वर्षांत सत्ता हातात असूनही वाहतुकीची कोंडी आणि जुन्या वाड्यांचा प्रश्‍न सोडविण्यात या मतदारसंघातील राजकीय नेतृत्वाला यश आले आहे. असे असताना काही वर्षांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा या प्रश्‍नाने नव्याने भर टाकली आहे. 

काय म्हणतात मतदार...
 मनीष भुतकर : आधीच अरुंद रस्ते आणि त्यावर वाढलेले अतिक्रमण यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही कोंडी कधी फुटणार?

 श्रीनिवास रापर्ति : जुने वाडे अतिशय धोकादायक झाले असून, अनेक लोक तसेच राहतात. हा प्रश्‍न तातडीने सोडविण्याची गरज आहे.

 आकाश सास्टे : मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शाळा आहेत. तेथे नियमित कोंडी होते. ती सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

 हर्षदा भोसले : शिवाजी व बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी तातडीने फोडण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT