पुणे

Pune News : सोशल मिडीयावरही कात्रज-कोंढवा रस्ता चर्चेत !

अशोक गव्हाणे

Pune News : रखडलेले रुंदीकरण आणि सातत्याने होणारे अपघात यामुळे मागील काही दिवसांपासून कात्रज-कोंढवा रस्ता कायम चर्चेत राहिला आहे. मात्र, नागरिकांबरोबर कात्रज-कोंढवा रस्ता समाज माध्यमांवरही चर्चेत आल्याचे दिसून येते. नागरिकहो सावधान! अशा आशयाचा फलक असलेला फोटो सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

'नागरिक हो सावधान! हा कात्रज कोंढवा रोड नाही, यमलोकला जाणारा रोड आहे, तरी कृपया सावधानतेने गाडी चालवा, ५८ अपघात आणि २६ निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. आठ वर्षे झाली महापालिका रोड करत आहे. सोंग घेऊन झोपलेल्या प्रशासनाचा जाहीर निषेध, सौजन्य एक त्रस्त नागरिक, जीव मुठीत धरुन जगणारा कात्रजकर' अशा प्रकारचा आशय या फोटोत लिहलेला दिसून येतो.

हा फोटो एका युजरने सोशल माध्यमांवर पोस्ट केला असून त्यावर एका युजरने प्रतिक्रिया देत सर्वांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचा सल्ला दिला आहे. तर, दुसऱ्या युजरने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल करण्यात येत असून सेवा देणे हे महापालिकेचे काम असल्याचे म्हटले आहे. काहींनी हा पुण्याचा समृद्धी महामार्ग असल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान, सातत्याने होणारे अपघात आणि रस्त्यााच्या स्थितीबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली आहे. त्यानंतर वाहतूक सुरळित करण्यासाठी १७५ वॉर्डनची नेमणूक करण्यासह कामाला गती आणि विविध उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT