कात्रज : चार महिन्यांपासून रस्ता बंद; नागरिकांची ससेहोलपट sakal
पुणे

कात्रज : चार महिन्यांपासून रस्ता बंद; नागरिकांची ससेहोलपट

सुखसागरनगरमधील प्रकार; नागरिकांसह व्यवयासिक हैराण

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : सुखसागरनगरमधील गंगोत्री हॉटेलजवळून खंडोबा मंदिरांकडे जाणारा रस्ता मागील ४ महिन्यांपासून पत्रे लावून अडविण्यात आला आहे. हा रस्ता बंद करण्यात आल्याने २ ते अडीच हजार नागरिकांसह व्यवसायिक हैराण झाले आहेत.

ही जागा खाजगी मालकीची असून महापालिकेने कोणत्याही परवानगीशिवाय या जागेतून रस्ता सुरु केला असून नागरिकांनी वहिवाट सुरु केली. महापालिकेकडे जागेसंबंधी मोबादला मागितला असता कुठलाही मोबदला मिळाला नसल्याचे जागा मालकांचे म्हणणे आहे. मात्र, रस्ता बंद केल्याने नागरिकांना अडचणीचे ठरत असून यशश्री, कॅनओपी, हॅमीपार्क आदी सोसायट्यांच्या नागरिकांना वळसा घालून खंडोबा मंदिराकडील रस्त्यावर जावे लागते. तर नागरिकांची ये-जा कमी झाल्याने व्यवसायांवरही मोठा परिणाम झाला आहे.

ही जागा महापालिका अतिक्रमण आयुक्त माधव जगताप आणि त्यांच्या आई आणि भावांच्या मालकीची आहे. त्यांना जागेचा मोबदला म्हणून रोख रक्कम हवी असून महापालिकेकडून ती तत्काळ देणे शक्य नसले तरी त्यावर कारवाई सुरु आहे. मात्र, तोपर्यंत एखाद्या महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्याने नागरिकांची अशी अडवणूक करणे योग्य नाही. तत्काळ रोख रक्कम देणे महापालिकेला शक्य नसताना एखादा अधिकारीच जर अशी अडवणुकीची भूमिका घेत असेल तर, सामान्य नागरिकांनी काय करावे? असा प्रश्न मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.

सर्व्हे क्रमांक १८/२ब मधील अडविण्यात आलेली जागा ६० फुटी रस्त्यांसाठी २ गुंठे बाधित होत आहे. सदर जागा ताब्यात घेण्याचे आदेश २०१५च्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या ठरावात दिले होते. मोबदल्यापोटी भूसंपादन कायदा २०१३नुसार होणारी नुकसान भरपाईही देण्याचे सांगण्यात आले आहे.

माझा हॉटेल व्यवसाय आहे. कोरोनाने आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यात रस्ता बंद केल्याने अर्ध्याहून अधिक ग्राहक कमी झाले आहेत.

- सुकेश शेट्टी, व्यवसायिक.

हा रस्ता बंद केल्याने आम्हाला पूर्ण वळसा घालून जावे लागते. त्यामुळे यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावा.

- राजेंद्र दरक - स्थानिक नागरिक

हा रस्ता पथविभागाने जागेचा कुठलाही मोबदला न देता १० वर्षापूर्वी परस्पर केला आहे. आता जागांमालकांकडून जागेचा मोबदला म्हणून रोख रकमेची मागणी होत आहे. त्यामुळे संबंधित जागेसाठी पथविभागाने तरतूद करुन दिली तर जागामालकाला मोबदला देऊन मार्ग निघेल. - -राजेंद्र मुठे, उपायुक्त (मालमत्ता आणि व्यवस्थापन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT