MLA Bhimrao Tapkir Sakal
पुणे

Pune News : पत्रकारांकडून लोकशाहीला बळकटी देण्याचे काम - भिमराव तापकीर

पुरस्काराने माणसांवर मोठी जबाबदारी येते. पत्रकार नेहमीच लोकशाहीला बळकटी देण्याचे काम करतात.

अशोक गव्हाणे

कात्रज - पुरस्काराने माणसांवर मोठी जबाबदारी येते. पत्रकार नेहमीच लोकशाहीला बळकटी देण्याचे काम करतात, असे मत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी म. सा यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त आनंद दरबार दत्तनगरच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा गुरू आनंद कार्यक्षम पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

पत्रकार रवी कोपनर, गणेश वाघमोडे, व्यंगचित्रकार धनराज गरड यांचा सन्मान करण्यात आला. जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच, अंध अपंगांसाठी अन्नदान व अन्नधान्य किटचे वाटपही यावेळी करण्यात आले.

तापकीर म्हणाले, 'लेखणीच्या माध्यमातून परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी पत्रकार प्रयत्न करतात. विरोधात बातमी लागली म्हणून कोणी त्यांच्यावर नाराज न होता उलट ते लिहितात, त्या गोष्टींकडे आपण संवेदनशीलपणे पाहून प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवे.

कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्रजी बाठिया, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, प्रविण चोरबेले, स्मिता कोंढरे, गणेश महाराज भगत, अक्षय जैन, संदीप बेलदरे, दीपक बेलदरे, देविदास जाधव उपस्थित होते. आवटे म्हणाले, 'धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज आहे.

धर्म म्हणजे धारणा, परंतु धर्माच्या नावाने भिंती बांधल्या जात असताना धर्माच्या नावाने सेतू बांधणे आणि तोडण्याचे काम चालू असताना जोडण्याचे काम महत्वाचे आहे. स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. सूत्रसंचालन महेश लुंकड आणि सौरभ धोका यांनी केले. कार्यक्रमास आनंद दरबार ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT