police arrested Team eSakal
पुणे

ठेवीदारांची फसवणूक प्रकरण; कौस्तुभ मराठेंसह दोघांना पोलिस कोठडी

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा

पुणे : सुवर्ण खरेदी योजनेत गुंतवणुकीच्या आमिषाने ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी मराठे ज्वेलर्सचे संचालक कौस्तुभ मराठे, त्यांची पत्नी मंजिरी हे दोघे दोन दिवसांपूर्वी न्यायालयात हजर झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

कौस्तुभ मराठे (वय ५४) आणि त्यांची पत्नी मंजिरी (वय ४८) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात मिलींद उर्फ बळवंत अरविंद मराठे, प्रणव मिलींद  मराठे तसेच कौस्तुभ अरविंद मराठे, मंजिरी कौस्तुभ मराठे, नीना मिलींद मराठे यांच्या विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शुभांगी कुटे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

"मराठे ज्वेलर्स"चे मिलींद मराठे यांनी मागील वर्षी व्यवसायातील तोट्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील त्यांच्या सराफी पेढीत रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर काही जणाना अटक करण्यात आली होती. दरम्यान, मराठे यांच्याकडुनही गुंतवणूकीचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी कुटे यांनी फिर्याद दिली होती. मराठे यांनी त्यांच्यासह ११ ठेवीदारांची पाच कोटी नऊ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणात गेल्या महिन्यात प्रणव मराठे यांना अटक करण्यात आली होती.

आरोपींनी आणखी काहीजणांची फसवणूक केली आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रारी करण्यात येत आहेत. त्यांना जामीन देण्यात येऊ नये. जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाब टाकू शकतात. तपासासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. एम. बी. वाडेकर यांनी युक्तीवादात केली होती. त्यानुसार, न्यायालयाने त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

SCROLL FOR NEXT