kerala nurse
kerala nurse 
पुणे

पुण्याच्या मदतीसाठी केरळच्या नर्स धावून येणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढते संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळ सरकारकडे मदत मागितली होती. केरळमधून याआधीही राज्यात नर्स आणि डॉक्टरांचे पथक आले होते. आता आणखी एक पथक लवकरच दाखल होण्याची शकता आहे. यातील आरोग्य कर्मचारी पुणे आणि मुंबईसाठी येतील. 
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये आयसीयुसाठी प्रशिक्षित नर्स, इन्टेसिविस्ट, अॅनास्थेटिस्ट, पुल्मोनॉलॉजीस्ट आणि फिजिशयन्सचे पथक पाठवण्यात यावं असं म्हटलं होतं. 

याबाबत केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंच्या या मागणीवर सकारात्मक विचार केला असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ  इंडियाने दिलं आहे. पत्राला उत्तर देण्यात आलं असून आरोग्य विभाग पाठपुरावा करत आहे असंही सांगण्यात आलं आहे. 

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, शहरात सध्या किमान अडीच हजार नर्सेसची गरज असून अनेक नर्सेस त्यांच्या गावी परतल्या आहेत. खाजगी रुग्णालयातील किमान 100 नर्सेसनी नोकरी सोडली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे उप अधीक्षक डॉक्टर संतोष कुमार एसएस म्हणाले की, गरजेनुसार मनुष्यबळ पुरवलं जाईल. पण त्यासाठी नर्सना चांगले वेतन देणं गरजेचं आहे. त्यांना 30 हजार रुपये देण्याचं सांगण्यात आलं होतं पण 26 हजार रुपयेच दिले. आता नर्सिंग असोसिएशनने 50 हजार रुपयांची मागणी केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

संतोष कुमार हे मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सेवा बजावलेल्या केरळमधील डॉक्टर, नर्सेसच्या पथकाचे प्रमुख होते. याआधी केरळमधून 40 डॉक्टर आणि 35 नर्सचे पथक महाराष्ट्रात आले होते. 45 दिवसांच्या सेवेनंतर ते केरळला परतले होते. दुसरीकडे महाराष्ट्रात आयसीयु युनिटची संख्या वाढवल्याने आणखी आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. पुण्यात तीन मोठ्या रुग्णालयांसाठी प्रशिक्षित नर्सेसची गरज भासणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT