Keshav Upadhye statement Mahavikas aghadi stop the development of pune politics shinde fadanvis govt  sakal
पुणे

Keshav Upadhye : महाविकास आघाडीने पुण्याचा विकास रखडवला; केशव उपाध्ये

भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पुण्याचा विकास त्यांनी रखडवला, एकही नवीन प्रकल्प पुण्याला दिला नाही, कोरोना काळात आर्थिक मदत केली नाही. हा सगळा अडीच वर्षाचा अनुशेष आता शिंदे-फडणवीस सरकार भरून काढत आहे.

या निवडणुकीत भाजपचा विजय होऊन महाविकास आघाडीचे विसर्जन होणार आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीतील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते.

आमदार माधुरी मिसाळ, प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रवक्ते कुणाल टिळक, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर यावेळी उपस्थित होते. उपाध्ये म्हणाले, ‘‘हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करणाऱ्या कसबा मतदारसंघात शरद पवार यांना अल्पसंख्याक समाजाचा मेळावा घ्यायला लागतो, यातच महाविकास आघाडीचा पराभव होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसमध्ये थोरात पटोले अशी फूट आहे, उद्धव ठाकरे गट विरून गेला आह आणि शरद पवार हे कधीच काँग्रेसला मदत करत नाही, त्यामुळे आमचा विजय निश्‍चीत आहे. भाजपने मेट्रो, पीएमपी सेवा सुरू केली, शहरातील इतर प्रकल्प मार्गी लावले.

पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधी कोणतेही नवीन प्रकल्प आले नाहीत, चालू असलेले प्रकल्प रखडवले. हा अनुशेष आता भरून काढला जात आहे. भाजप हा विकासाकडे नेणारा पक्ष आहे.

हा तर पवारांचा जुनाच खेळ

शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली, त्यावर उपाध्ये म्हणाले, ‘‘अडीच वर्षे सत्तेत असताना पवार यांना एमपीएससीचा, एसटी कामगारांचा प्रश्न सोडवता आला नाही.

त्यांनी वेळीच लक्ष घातले असते तर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकरचा, अनेक एसटी कामगारांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. पण सत्तेत असताना गप्प बसायचे आणि विरोधात असताना राजकारण खेळायचं हा यांचा जुनाच खेळ आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांची पदयात्रा

रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (ता. २३) दुपारी साडेचार वाजता भिडे पूल परिसरातून पदयात्रा काढणार आहेत. तर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता. २४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं रोड शो होणार आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT