CCTV Footage esakal
पुणे

Pune Crime : खडकीतील बालिकेच्या खूनप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू

खडकी परिसरात खून झालेल्या बालिकेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, आरोपीचे धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

खडकी परिसरात खून झालेल्या बालिकेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, आरोपीचे धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

पुणे - खडकी परिसरात खून झालेल्या बालिकेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, आरोपीचे धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून खडकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार यादरम्यान ‘सीएएफव्हीडी’ मैदानाच्या कडेला शुक्रवारी (ता. २) दुपारी एका तीनवर्षीय बालिकेचा मृतदेह आढळून आला होता. आरोपीने बालिकेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मैदानाच्या कडेला फेकून दिला होता. खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या मृत बालिकेचे आई-वडील किंवा नातेवाईक समोर आलेले नाहीत. त्यामुळे तिची अद्याप ओळख पटलेली नाही. वैद्यकीय तपासणीत या बालिकेच्या गळ्यावर आणि डोक्यावर जखम आढळून आली आहे. डॉक्टरांनी मृत बालिकेचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT