खडकवासला धरणाचे तुळशीदास मते यांनी सोमवारी टिपलेले छायाचित्र.
खडकवासला धरणाचे तुळशीदास मते यांनी सोमवारी टिपलेले छायाचित्र. 
पुणे

पुणे शहराच्या ३.५ टीएमसी पाण्यावर संक्रांत

गजेंद्र बडे

‘खडकवासला’तील ३.९० ‘टीएमसी’वर इंदापूरचा हक्क 
पुणे - इंदापूर तालुक्यासाठी सोडले जाणारे नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पुणे शहराच्या साडेतीन टीएमसी पाण्यावर संक्रांत येण्याची शक्यता आहे. खडकवासला प्रकल्पातील ३.९० टीएमसी पाणी सणसर जोड कालव्याद्वारे इंदापूर तालुक्‍यातील २२ गावांसाठी देण्याची प्रकल्पीय तरतूद आहे. परंतु, ग्रामीण भागातील वाढलेले सिंचन क्षेत्र आणि शहरातील ‘पाणीबाणी’ पाहता हे कितपत शक्‍य होईल, हा खरा प्रश्‍न आहे.

खडकवासला प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठ्याच्या वाटपाबाबत पुणे पाटबंधारे विभागाने तयार केलेली अधिकृत टिप्पणी ‘सकाळ’कडे उपलब्ध झाली असून, त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. खडकवासला प्रकल्पात टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला ही चार धरणे येतात. त्यांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता २९.१५ टीएमसी आहे. यामध्ये टेमघरमध्ये ३.७१, पानशेत - १०.६५, वरसगाव - १२.८२ आणि खडकवासलातील १.९७ टीएमसी पाण्याचा समावेश आहे. 

टेमघर वगळता खडकवासला प्रकल्पातील उर्वरित तीन धरणांचा उपयुक्त पाणीसाठा हा २५.४४ टीएमसी आहे. यातील सुमारे ११.५० टीएमसी पाणी हे पुणे शहरासाठी आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील काही गावांसाठी  सणसर जोड कालव्याद्वारे ३.९० टीएमसी पाणी देण्याची प्रकल्पीय तरतूद आहे. परिणामी ही गावे जलसंपदा नियमन प्राधिकरणाकडे किंवा उच्च न्यायालयात जाण्याची शक्‍यता आहे. या गावांचे पाणी पुणेकरांना विनातक्रार वापरता यावे, यासाठी या गावांना नीरा डावा कालव्याद्वारे सणसर जोड कालव्यातून पाणी उपलब्ध करून देण्याचे ठरले होते. सणसर जोड कालव्याच्या प्रकल्प अहवालात ही बाब नमूद केलेली आहे.

खडकवासला प्रकल्पातून ३.९० टीएमसी पाणी सणसर जोड कालव्याद्वारे इंदापूर तालुक्‍यातील २२  गावांना देण्याची तरतूद आहे. परंतु बारामती, दाैंड आणि इंदापूर तालुक्यांतील सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. खडकवासला धरणापासून सणसर जोड कालवा हा सुमारे १७२ किलोमीटर आहे. त्यामुळे तिथपर्यंत निम्म्यापेक्षाही कमी पाणी पोचते. हे पाणी दिल्यास शेतीच्या आणि शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या हे शक्‍य नाही.
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT