Panshet_Dam_Pune
Panshet_Dam_Pune 
पुणे

खडकवासल्यापाठोपाठ पानशेतही आलंय भरत; मुठा नदीकाठच्यांनो दक्ष राहा!

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला (पुणे) : पानशेत धरण रविवारी (ता.16) रात्री नऊ वाजता 95 टक्के पाणीसाठा झाला असून खडकवासला धरणाच्या पाठोपाठ आता पानशेत धरणही भरत आले आहे. आज (सोमवारी ता.17) पानशेत धरण 100 टक्के भरणार असल्याने त्याबाबतीत खबरदारी घेण्याच्या सूचना खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दोन्ही धरणावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

सध्या पानशेत धरणातील येवा सुमारे सात हजार क्यूसेक आहे. याच वेगाने येवा कायम राहिल्यास आज संध्याकाळपर्यंत धरण शंभर टक्के भरेल. पाऊस असताना शनिवारी बारा तासात तीन टक्केने वाढ झाली होती. रविवारी पाऊस कमी असताना अडीच टक्केने वाढ झाली. त्यामुळे आज रात्रीपर्यंत धरण भरेल, अशी परिस्थिती आहे. म्हणून पानशेत धरणावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तर पानशेत धरणातून सोडलेला विसर्ग खडकवासला धरणात जमा होत असल्याने खडकवासला येथे ही दक्ष राहण्याच्या सूचना दिल्याचे पाटील यांनी सांगितले. 

रविवारी सकाळी सहा ते संध्याकाळी पाच वाजता या अकरा तासांत खडकवासला येथे 2, पानशेत येथे 23, वरसगाव 25, टेमघर येथे 35 मिलिमीटर पाऊस झाला. धरणातील विसर्ग शनिवारी (ता.15) रात्री 16 हजार247 क्यूसेक होता. रविवारी (ता.16) सकाळी सहा वाजता नऊ हजार 350 क्यूसेक होता, तो संध्याकाळी पाच वाजता एवढा दोन हजार 550 क्यूसेक होता. 

नऊ दिवसात नऊ टीएमसीची वाढ :

रविवारी चारही धरणात मिळून 24.44 टीएमसी पाणी जमा झाले आहे. मागील शनिवार 8 ऑगस्ट रोजी या चार धरणात मिळून 16.89 टीएमसी होते. अशा 7.350 टीएमसी पाणी वाढले. तर बुधवार पासून धरणात विसर्ग सुरू केला आहे. रविवारअखेर सव्वा दोन टीएमसी पाणी मुठा नदीत सोडून उजनी धरणात जमा होते. अशा प्रकारे नऊ टीएमसी पाणी जमा झाले. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

धरणाचे नाव धरणाचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी मध्ये) रविवार (ता.१६) अखेर जमा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी मध्ये) टक्केवारी
खडकवासला 1.97 1.86 94.08
पानशेत 10.65 10.03 94.25
वरसगाव 12.83 10.17 79.35
टेमघर 3.71 2.38 64.16


चार धरणातील एकूण पाणीसाठा : 24.44 टीएमसी (83.86 टक्के)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT