Khadakwasla needs half a TMC to fill the project 
पुणे

खडकवासला प्रकल्प भरण्यासाठी फक्त अर्ध्या टीएमसीची गरज; सध्या 'एवढा' आहे पाणीसाठा

सकाळवृत्तसेवा

पुणे : खडकवासला प्रकल्पातील चार धरणांपैकी वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे पूर्ण भरली असून, टेमघर धरणातही सुमारे 90 टक्के पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता 29.15 टीएमसी असून, सध्या 28.76 टीएमसी साठा झाला आहे. संपूर्ण प्रकल्प भरण्यासाठी केवळ 0.39 टीएमसी पाण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खडकवासला धरणातून काल रात्रीपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारी सकाळी मुठा नदीपात्रात 9 हजार 416 क्‍युसेक आणि कालव्यातून 1054 क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. पानशेत धरणातून तीन हजार 908 क्‍युसेक आणि वरसगाव धरणातून दोन हजार 600 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. उजनी धरणही पुढील आठवड्यात भरण्याची शक्यता आहे. उजनी धरणात सध्या 49.48 टीएमसी (92. 36 टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

भाटघर, नीरा देवघर, वीर, मुळशी, कळमोडी, आंद्रा, आणि नाझरे ही धरणे पूर्ण भरली आहेत. तर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह आणि विसापूर या धरणांत अद्याप 30 ते 45 टक्केच पाणीसाठा आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी : 
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रात्रीतून 31 मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव 23 मिमी, पानशेत 15 मिमी आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 मिमी पावसाची नोंद झाली.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी : 
टेमघर 3.31   (89.34)
वरसगाव 12.82   (100)
पानशेत 10.65     (100)
खडकवासला 1.97  (100)


इतर धरणांतील पाणीसाठा
भामा-आसखेड 6.57     (85.69)
पवना 8.04     (94.45)
मुळशी 18.46   (100)
भाटघर 23.50     (100)
नीरा देवघर 11.73    (100)
वीर 9.41    (100)
उजनी 49.48    (92.36)

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT