liquor
liquor  
पुणे

खडकवासला: अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा

सकाळ डिजिटल टीम

खडकवासला- : धरण परिसरात कालव्याच्या लगत असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अवैध दारू विक्री सुरू होती. माहिती मिळाल्यामुळे हवेली पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी छापा टाकून एकशे पाच लिटर दारू जप्त केल्याची कारवाई केली. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत दारू विक्री प्रकरणी विजय पवार, रामदास चंदू सोनवणे दोघे (रा. खडकवासला) यांना अटक केली आहे. सहायक फौजदार प्रदीप नांदे, सहायक फौजदार दिलीप शिंदे, संजय शेंडगे, निलेश राणे, ठाणे अंमलदार विलास प्रधान यांनी ही कारवाई केली (Khadakwasla Police raid on illegal sale of liquor alcohol seized)

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन असताना या परिसरात छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू आहे, अशी माहिती पोलिस शेलार यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी गेले. दारुची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणावरून त्यांनी सुमारे एकशे पाच लिटर हातभट्टीची गावठी दारू जप्त करण्यात आली. अंदाजे किंमत चार हजार दोनशे रुपये व रोख रक्कम एक हजार सातशे साठ रुपयांची कारवाई करण्यात आली. सुमारे ३०- ३५ लिटरचे तीन प्लॅस्टिकचे ड्रम व सुट्टी विक्री करण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दारू भरलेली होती. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार प्रदीप नांदे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT