28.70 TMC water storage in Khadakwasla Dam
28.70 TMC water storage in Khadakwasla Dam sakal
पुणे

खडकवासला प्रकल्पात बुधवार अखेर ८४ टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला (Khadakwasla) प्रकल्पामध्ये बुधवारी सायंकाळपर्यंत २४.४९ टीएमसी (८४ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी खडकवासला (Khadakwasla) प्रकल्पातील चार धरणांमध्ये ९.८४ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पामध्ये सुमारे १५ टीएमसी साठा अधिक आहे.(Khadakwasla project finally gets 84% ​​water storage by Wednesday)

खडकवासला धरण वगळता या प्रकल्पातील अन्य तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मध्यम पाऊस झाला. बुधवारी दिवसभरात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २० मिलिमीटर, वरसगाव ५ मिमी, पानशेत ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या खडकवासला धरणाच्या सांडव्यातून एक हजार ९२९ क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

धरणांतील बुधवारपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये) आणि कंसात टक्केवारी

  • टेमघर २.५६ (६८.९५)

  • वरसगाव १०.२९ (८०.२५)

  • पानशेत ९.६७ (९०.७८)

  • खडकवासला १.९७ (१००)

  • भामा आसखेड ६.२९ (८२.०६)

  • पवना ७.१५ (८४)

  • उजनी २१.७६ (४०.६१)

  • माणिकडोह ३.४० (३३.४५)

  • येडगाव १.५३ (७८.६५)

  • वडज ०.६४ (५४.३३)

  • डिंभे ८.६४ (६९.१४)

  • घोड १.३६ (२७.९६)

  • विसापूर ०.०७ (७.९३)

  • कळमोडी १.५१ (१००)

  • नीरा देवघर १०.८३ (९२.३६)

  • भाटघर १६.१६ (६८.७४)

  • वीर ९.१४ (९७.१७)

  • नाझरे ०.०८ (१४)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT