drought sakal
पुणे

Pune Drought : खरीप हंगाम संकटात; पुणे जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट

पुणे जिल्ह्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लांबला आहे. यामुळे भाताच्या रोपवाटिका टाकण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लांबला आहे. यामुळे भाताच्या रोपवाटिका टाकण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघून बघून आज ना उद्या पाऊस पडेल, या आशेवर दोन आठवड्यांपूर्वी कोरड्या जमिनीतच भाताच्या रोपवाटिका टाकल्या.पण त्या आता पावसाअभावी करपू लागल्या आहेत.

आता पाऊस पडला तरी, ही भातरोपे पुनर्जीवित होण्यास आणि भात लावणी करण्यास नेहमीच्या तुलनेत उशीर होणार आहे. याचा फटका भात उत्पादनाला बसणार आहे. शिवाय डाळवर्गीय पिके घेता येणार नसल्याने भविष्यात जिल्ह्यातील डाळींच्या उत्पादनात घट होणार आहे. परिणामी डाळी महागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

भातशेतीचे गाव अशी वेल्हे तालुक्यातील हिरपोडी या गावाची ओळख आहे. पण यंदा पावसाला उशीर झाल्याने भाताच्या रोपवाटिका टाकण्यास गेल्या वर्षीपेक्षा यंदा तीन आठवड्यांचा उशीर झाला आहे. ही रोपे आता कुठे उगवू लागली होती. परंतु पाऊस नसल्याने ही आता मोठी होण्यापूर्वीच करपू लागली आहेत. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या किंवा विंधनविहीरीच्या पाण्यावर भातरोपे तयार केली आहेत. परंतु या रोपांच्या लावणीसाठी पुरेसा पाऊस पडला नसल्याने ती रोपे लावायची कशी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या वृत्ताला कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

मागील सुमारे तीन आठवड्यांपासून आजतागायत अद्याप पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात जेमतेम केवळ सहा ते सात टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या झालेली पिकेही पावसाअभावी करपू लागली आहेत. यामुळे जिल्ह्यावर यंदा कोरड्या दुष्काळाचे सावट पसरू लागले आहे.

जून महिना संपत आला तरीही, अद्याप जिल्ह्यात खरीप पेरण्यांसाठी पुरेसा पाऊस पडू शकलेला नाही. याचा थेट परिणाम खरीप पेरण्यांवर झाला आहे. जिल्ह्यातील काही भागात मे महिन्याच्या मध्यात एक पाऊस झाला होता. या एकाच पावसावर काही पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर पाऊस झालाच नसल्याने ही पिकेही पावसाअभावी जळू लागली आहेत.

पुणे जिल्ह्याचे उसाचे क्षेत्र वगळता खरीप पिकाचे एकूण सरासरी क्षेत्र हे १ लाख ९५ हजार हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात.

पुणे जिल्ह्यातील खरीप दृष्टीक्षेपात.‌‌..

- जिल्ह्यातील तेरापैकी आठ खरीप तालुके

- खरीप तालुक्यांमध्ये हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव यांचा समावेश.

- जिल्ह्यातील खरीप गावांची संख्या ---- १ हजार ३८०

- पुणे जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (उसासह) तीन लाख ६२ हजार हेक्टर.

- एकूणपैकी खरीप पिकांसाठीचे क्षेत्र --- एक लाख ९५ हजार हेक्टर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weather Alert : पुढचे ८ दिवस इशारा! पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला

रुपया पुन्हा घसरला! सार्वकालिक नीचांकी पातळीवर, ७९ पैशांनी कोसळून ९५.२८ वर

IPL 2026: हैदराबाद-गुजरातमध्ये प्लेऑफ निश्चित करण्यासाठी हातघाईची लढाई; कशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Nida Khan: निदा खानला १४ दिवसांची कोठडी; एसआयटीकडून आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू, ‘पॉश’ कायद्याचे उल्‍लंघन..

SCROLL FOR NEXT