Crime Sakal
पुणे

खेड-शिवापूर टोलनाक्यावर 14 लाखांचा गुटखा जप्त

याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : पुणे सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर टोलनाक्यावर शुक्रवारी पहाटे राजगड पोलिसांनी टेम्पोमधून वाहतूक करण्यात येणारा 14 लाख 17 हजार पाचशे रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कानाराम मिश्रिलाल चौधरी (वय 32) आणि देवेंद्र गणपतलाल मेघवाल (वय 25, दोघेही रा. वडगाव, हवेली, पुणे. मूळ रा. मांडा, ता. मारवाड दक्षिण, जि. पाली, राजस्थान) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. एक गुटखा वाहतूक करणारा टेम्पो शुक्रवारी पहाटे पुणे सातारा रस्त्याने पुण्याच्या बाजूला जाणार असल्याची माहिती राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहाय्यक फौजदार कृष्णा कदम, पोलिस हवलदार अजित माने आणि पोलिस नाईक तुषार खेंगरे यांच्या पथकाने खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ सापळा रचला.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा एक टेम्पो पुण्याच्या दिशेने जाताना आढळून आला. यावेळी या टेम्पोची तपासणी केली असता त्यात 14 लाख 17 हजार पाचशे रुपयांची वेगवेगळ्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची पोती आढळून आली. हा सर्व माल आणि टेम्पो राजगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच याप्रकरणी राजगड पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT