khed shivapur toll plaza protest traffic diversion by saswad 16th feb 2020 
पुणे

आंदोलनामुळं पुणे-सातारा हायवेवरील वाहतूक मार्गात रविवारी बदल; कसा असेल मार्ग?

सकाळ डिजिटल टीम

नसरापूर (पुणे) : खेड-शिवापूर टोल नाका हटाव आंदोलन उद्या (रविवार, ता. 16) होत आहे. या वेळी कायदा हातात घेणार नाही, टोल नाक्‍यावर वसुली होऊ न देता शांततेत भजन म्हणत आंदोलन सुरू होईल, प्रवाशांची अडवणूक होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी माहिती कृती समितीच्या वतीने शनिवारी देण्यात आली. पण, या टोल विरोधी आंदोलनामुळं वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्कार 
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कृती समिती, लोकप्रतिनिधी, महामार्ग प्राधिकरण, रिलायन्स इन्फ्रा व पीएमआरडीए अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. त्यावर कृती समितीने बहिष्कार टाकला होता. टोल हटविणे हीच मागणी आहे व ती कायदेशीर आहे. इतर मलमपट्टी नकोय, त्यामुळे आम्ही या बैठकीस उपस्थित राहिलो नाही, अशी भूमिका कृती समितीने जाहीर केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा 

प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग 
खेड शिवापूर टोल नाक्‍यावर आंदोलन होत असल्याने सातारा बाजूकडून येणाऱ्या प्रवाशांना कापूरहोळ येथून सासवडमार्गे पुण्याकडे जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात आला आहे, तर पुण्याकडून साताऱ्याकडे जाण्यासाठी कात्रज येथून सासवडमार्गे कापूरहोळ किंवा शिवापूर येथून कासुर्डी मरिआई घाटमार्गे सासवड व कापूरहोळ या पर्यायी मार्गाने जाता येऊ शकेल. 

टोल लेन वाढवणे, स्थानिकांना टोलमाफी देणे, या तात्पुरत्या मलमपट्टीवर आमचे समाधान होणार नाही. टोल हटवणे हीच प्रमुख मागणी आहे, त्यासाठीच हे आंदोलन आम्ही करत आहोत.
- माउली दारवटकर, निमंत्रक, टोल हटाव कृती समिती

कोणत्याही राजकीय पक्षाची घोषणा व झेंडा न घेता हातात काळा झेंडा घेऊन आंदोलक सहभागी होतील. पुण्याकडे जाणाऱ्या टोल बूथजवळील टोल कार्यालयानजीक आंदोलन होईल. आंदोलकांसाठी शिवराय मंगल कार्यालयात भोजन व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. कोणतीही हुल्लडबाजी न करता प्रवासी, महिला, मुले, रुग्णवाहिकांना मदत केली जाईल. 
- दिलीप बाठे, निमंत्रक, टोल हटाव कृती समिती
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Morcha: मतदारयादी घोटाळा की मोठा राजकीय कट? ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाने बनावट अर्ज दाखल, Uddhav Thackeray म्हणाले...

Raj Thackeray : पुरावा कुठाय विचारता ना? हे घ्या! राज ठाकरेंनी फक्त आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला...

Sky Football Stadium: सौदी अरेबियातील स्काय स्टेडियमचा व्हायरल Video खोटा! समोर आलं वेगळंच सत्य

'साधी माणसं' फेम अभिनेता होणार बाबा; डोहाळे जेवणाला पत्नीसोबत थाटात केली एंट्री, होणाऱ्या आईच्या लूकने वेधलं लक्ष

Latest Marathi News Live Update : मतदार यादीतील त्रुटी वेळीच दाखवणे गरजेचे – हसन मुश्रीफ

SCROLL FOR NEXT