पुणे

किरण गोसावीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शोध घेऊन अटक - पुणे पोलिस

सकाळ डिजिटल टीम

तो सरेंडर करणार असल्याची चर्चा होती. मात्र तसे काही घडले नाही. त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात पंच किरण गोसावी याला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होतात त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशापर्यंत जाऊन देखील आले होते मात्र तो हाती लागला नव्हता. आता त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. याची माहिती पुणे पोलिस आय़ुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

पुणे पोलिसांनी सांगितले की, किरण गोसावी फसवणूक प्रकरणी फरार होता. २०१८ पासून तो फरार होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आम्ही त्याला शोधत होतो. आमची पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली होती. त्याला आता पकडण्यात आलं आहे. त्याच्यावर चार्जशीटचं काम सुरु असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे

पहाटे तीनच्या सुमारास कात्रजमधून ताब्यात घेतलं आहे. एका लॉजमध्ये तो थांबला होता. तो सरेंडर करणार असल्याची चर्चा होती. मात्र तसे काही घडले नाही. त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच एनसीबी किंवा मुंबई पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केलेली नाही. तशी मागणी केल्यास रितसर प्रक्रियेनुसार पुढची कारवाई होईल असेही अमिताभ गुप्ता म्हणाले.

किरण गोसावीचा शोध घेण्यात दिरंगाई कशामुळे झाली याबाबत विचारले असता त्यावेळी काय घडलं यावर मी काही बोलू शकत नाही असं पुणे पोलिस आय़ुक्तांनी सांगितले. किरण गोसावी हा २०१८ पासून फरार होता. आर्यन खानसोबतच्या सेल्फीनंतर तो चर्चेत आला. त्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोनंतर पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते.

एका व्यक्तीला मलेशियाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याने फसवणूक केली होती. त्याप्रकरणी तो फरार होता. दरम्यान, गेल्या काही दिवसात त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शोध घेतला आणि अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

किरण गोसावी जेव्हा बाहेर फिरताना सचिन पाटील म्हणून ओळख सांगत होता. बनावट नाव आणि ओळखीने त्यानं अनेक ठिकाणी नोंद केली आहे. एका एनजीओचा सदस्य आणि डिटेक्टिव्ह एजन्सीचा मेंबर असल्याचा दावाही त्याने केला. आयात निर्यात आणि नोकरी देणारी एजन्सीचे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2018मध्ये मलेशियात हॉटेलमध्ये नोकरी देण्याबाबत पोस्ट टाकल्यानंतर त्याला प्रतिसाद देत पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणांची फसवणूक गोसावी याने केली होती. त्यांनतर तो फरार घोषित करण्यात आला होता. आर्यन खान प्रकरणात मुख्य पंच म्हणून भूमिका बजावली नंतर पुन्हा एकदा पुणे पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात आला आणि रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT