किरण गोसावी sakal
पुणे

पुण्यात किरण गोसावीवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल

फरासखाना, लष्कर पाठोपाठ वानवडी पोलिस ठाण्यात नोकरीच्या आमिषाने फसवणुक केल्याची नोंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावी व त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणूकीचा आणखी एक गुन्हा वानवडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. फरासखाना, लष्कर पोलिस ठाण्यापाठोपाठ वानवडी पोलिस ठाण्यातही रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने गोसावीकडून तरुणांची फसवणूक सुरू होती.

किरण प्रकाश गोसावी (रा. गुरू सीमरन सोसायटी, पाम बीच जवळ, नवी मुंबई ), कुसुम गायकवाड (रा. लष्कर) तसेच त्यांच्या आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश माणिकराव वाघमारे (रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोसावीविरुद्ध कसबा पेठेतील चिन्मय देशमुख या तरुणाला परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर पोलिसांनी त्यास फरारी घोषीत केले होते. त्यानंतर आर्यन खान प्रकरणामध्ये गोसावी हा "नार्कोटीक्‍स कंट्रोल ब्युरो'साठी (एनसीबी) पंच म्हणून काम पाहात होता. आर्यन खानसमवेत सेल्फी घेतल्यानंतर गोसावी पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास चार दिवसांपुर्वीच अटक केली होती. त्यास पाच नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, गोसावी हा तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करीत "जॉब फ्रॉड'चे मोठे रॅकेट चालवित असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर लष्कर पोलिस ठाण्यात गोसावी व कुसुम गायकवाड यांच्याविरुद्ध शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ वानवडी पोलिस ठाण्यातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गोसावीची वाघमारे, त्यांचा मित्र अनिल पवार व शिवा जमादार यांच्यात 2018 मध्ये भेट झाली होती. त्यावेळी त्याने परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखविण्याबरोबरच गुंतवणुकीच्या योजनांची माहिती फिर्यादीस दिली होती.

गोसावी व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीस नोकरी देण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून दिड लाख रुपये घेतले. त्यानंतर नोकरी दिली नाही. पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

SCROLL FOR NEXT