पुणे

Kirit Somaiya in Pune: परवानगी नसताना त्याच पायऱ्यांवर सोमय्यांचा सत्कार

सकाळ डिजिटल टीम

पुणे: किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी आले आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. ऐन महानगर पालिकेच्या तोंडावर हा प्रकार घडला असून त्याचा वापर करत शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. भाजपचे नगरसेवक महापालिकेच्या पायऱ्यांवर जमले आहेत. यावेळी किरीट सोमय्यांचा महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला आहे. सोमय्यांचा शाल, श्रीफळ आणि चाबूक देऊन सत्कार करण्यात आला आहे. हा सत्कार करायला पोलिसांकडून परवानगी नव्हती,. मात्र तरीही हा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी म्हटलंय की, उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी याच पायऱ्यांवर माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीनं ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट दिलं होतं, असा आरोप त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांचं नाव सांगावं. त्याचा मालक केएम हॉस्पिटलचा मालक आहे. उद्धव ठाकरेंनी पुण्यातल्याच लोकांच्या जीवाशी खेळलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची बेनामी संपत्तीवर कारवाई केल्याशिवाय हा सोमय्या गप्प बसणार नाही.

सोमय्यांचं आज जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. मागील शनिवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. थोड्याच वेळात किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या पायऱ्यांवरुन ते पडले होते, त्याच पायऱ्यांवर मोठी गर्दी झाल्याचं दिसत आहे. मात्र, या पायऱ्यांवर कसल्याही प्रकारचा सत्कार करता येणार नाही. सार्वजनिक कार्यक्रम करता येणार नाहीये. तशी परवानगी देण्यात आली नाहीये.

धक्काबुक्कीवेळी काय घडलं होतं?

जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या (kirit somaiya) गेल्या शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायऱ्यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले.

एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून हवेत भिरवला व त्या शर्टने सोमय्या (kirit somaiya) यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलरपकडून जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसऱ्या पायरीवरून ओढले (attack Case) होते. त्यामुळे सोमय्या पडले व त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागला. त्यानंतर सोमय्या यांच्या गाडीसमोर शहराध्यक्ष मोरे हे झोपले. इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हाताने व बुक्यांनी मारहाण केली होती. दगड घेऊन सोमय्या यांच्या जिवास धोका पोहचविण्यास उद्देशाने थांबले होते, असे तक्रारीत म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT