पुणे

'अमिताभ गुप्ता सुटणार नाहीत...'; पुण्यात दाखल होताच सोमय्या कडाडले

Kirit Somaiya आज पुण्यात असून, ते महानगरपालिकेत जाणार आहेत.

सुधीर काकडे

भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज पुन्हा पुणे महानगर पालिकेत (Pune Municipal Corporation) येणार आहेत. पुण्यात दाखल होताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर देखील सोमय्या यांनी गंभीर आरोप केले. वाधवान प्रकरणातून ते सुटले मात्र आपल्याला जीवे मारण्याच्या प्रयत्नातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते आता सुटणार नाही असं म्हणत त्यांनी पुणे महानगरपालिकेत एवढे गुंड कसे घुसले, पोलीस आयुक्तांना ते दिसत नाहीत का? त्यांना अटक का झाली नाही? असे सवाल गुप्ता यांना उद्देशून केले.

काही दिवसांपूर्वीच सोमय्या पुणे महानगरपालिकेत आल्यानंतर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. यावेळी ते खाली पडल्याने त्यांच्या हाताला जखम झाली होती. त्यानंतर आज भाजपकडून त्यांचा त्याच ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आज सकाळपासूनच पुणे महानगरपालिका परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. तर काँग्रेसने यावेळी महानगरपालिकेच्या आवारात पक्षाचा कार्यक्रमक घेणं योग्य नसल्याचं म्हणत त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे.

दरम्यान, सोमय्या यांच्या येण्याने महानगरपालिकेत पुन्हा एकदा राडा होण्याची शक्यता आहे. पुण्यातील शिवाजी नगर जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तळोजा जेल परिसरात बिबट्याचा वावर? व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर; वन विभागानं नेमकं काय सांगितलं?

Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ५ दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार, 'या' भागांना फटका बसणार

MLA Fund : आमदारांच्‍या नशिबी फंडाची प्रतीक्षाच; वर्षभरात केवळ ६.९३ कोटींचा निधी

Crime Viral Video : प्रियसीसोबत बोलताना सापडला अन् प्रियकराला चोपचोपला, कोल्हापुरातील घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

India T20 World Cup 2026 Squad: हार्दिक पांड्याकडे पुन्हा उप कर्णधारपद? शुभमन गिलच्या निवडीवरून माजी खेळाडूचं मोठं विधान, बरोबर १ तासानंतर 'गेम' होणार?

SCROLL FOR NEXT