पुणे

व्यसनमुक्तीची शपथ

CD

किरकसाल ग्रामस्थांकडून व्यसनमुक्तीचा नारा

रायगडावर घेतली शपथ; सकारात्मक उपक्रमातून ग्रामविकासाला पाठबळ

फिरोज तांबोळी : सकाळ वृत्तसेवा
गोंदवले, ता. २ : ग्रामविकासाबरोबरच सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आदर्श गाव किरकसाल ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीचा नारा दिला. रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत व्यसनमुक्तीची शपथ घेऊन नवयुवकांसह ग्रामस्थांनी नववर्षाची सुरुवात केलीय. यातून गाव अधिक सुदृढ होणार असल्याने हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
माण तालुक्यातील आदर्शगाव किरकसाल ग्रामस्थांकडून नेहमीच सकारात्मक उपक्रम राबवून ग्रामविकासाला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामस्थांच्या एकीमुळे राज्याच्या नकाशावर किरकसालची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शासनाच्या अनेक स्पर्धेत सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रमुख गावांमध्ये हे गाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते.
लोक प्रबोधनासाठी गावात विविध उपक्रम राबविण्यात येतातच; परंतु नववर्षाच्या स्वागताला ‘दारू नको, दूध प्या’ हा उपक्रम अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी अखंडितपणे सुरू ठेवला आहे. व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न यातून करण्यात येत आहे. आतापर्यंत दारू, मिश्री, तंबाखू, गुटखा, शीतपेय आदींसह मटका, जुगार या व्यसनातून अनेक जण मुक्त झाल्याने या उपक्रमाला चांगले यशही मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांपासून नववर्षाचे स्वागत स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या रायगडावर जाऊन व्यसनमुक्तीची शपथ घेऊन केले जाते.
सरत्या वर्षाला निरोप देताना ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमासाठी ग्रामस्थ गावातील मारुती मंदिराजवळ एकवटले. टाळ मृदुंगाच्या गजरात भजनाला सुरुवात झाली. त्यानंतर सर्वांना दुधाचे वाटप करण्यात आले. नववर्षाची पहाट व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊनच उजाडली. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही व्यसनमुक्तीची शपथ घेण्यासाठी तब्बल ४८ जण रायगडावर पोचले. केवळ ऐतिहासिक स्थळाला भेट देण्याचा हा उपक्रम नाही, तर छत्रपतींच्या साक्षीने व्यसनमुक्तीचा ध्यास ठरलाय. यामध्ये ग्रामस्थांसोबतच नवतरुणांचाही मोठा सहभाग असल्याने भविष्यातील व्यसनमुक्त व सदृढ पिढी घडण्याचा मार्ग सुकर होत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

------------------------------

कोट

सध्या तरुणांमध्ये उत्तेजक शीतपेय घेण्याचा नवा फंडा सुरू आहे. याच्या आहारी जाऊन अनेकांना दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. त्यामुळे विशेषतः तरुणांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरत असून, अनेकांनी नववर्षाच्या स्वागतालाच अशी शीतपेय न घेण्याचा संकल्प केला आहे.

- अमोल काटकर, माजी सरपंच.

-------------------------------

कोट

व्यसनाधीनतेमुळे कुटुंबाला आर्थिक भार सोसावा लागत होताच; शिवाय आरोग्याच्याही समस्या उद्‌भवून शारीरिक त्रास सोसावा लागत होता. यातून कौटुंबिक स्वास्थ्य बिघडतच चालले होते. त्यामुळे यंदा मनाचा निश्चय करून कायमस्वरूपी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेतली आहे.

- तुकाराम काटकर, ग्रामस्थ.
-----------------------------
02542
रायगड : येथे नववर्षानिमित्त व्यसनमुक्तीची शपथ घेताना किरकसाल ग्रामस्थ. (फिरोज तांबोळी : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Deadline Rule: आता दंड की सवलत? अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? जाणून घ्या नियम...

Ikkis Movie Review: भारतमातेच्या वीरपुत्राची शौर्यगाथा; कसा आहे धर्मेंद्र' यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस'

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात विकासाची पवनचक्की फिरतेय; पण शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न अनुत्तरितच!

Oppo Reno 15 Series Launch Date : तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणाऱ्या ‘Oppo Reno 15’ सीरीजची भारतातील ‘लाँच डेट’ जाहीर!

Latest Marathi News Live Update: प्रभाग क्रमांक ३५ मध्ये दोन उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT