पुणे

ग्रामसेवक अभिषेक बोत्रे यांच्यावर चाकू हल्ला

विजय जाधव

भोर (पुणे) - जलयुक्त शिवार योजनेतील कामाच्या बिलावरून गुढे-निवंगण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अभिषेक विठ्ठल बोत्रे यांच्यावर गुरुवारी (ता.३१) गावातील तरुणाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. चाकूहल्ला करणारा अरविंद दिनकर दिघे 
(वय.२७, रा. निवंगण) यास पोलिसांनी अटक केली.

भोर-महाड मार्गावरील आंबेघर (ता.भोर) गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवंगणमध्ये जलयुक्त शिवार योजनेतील शिवकालीन साठवण टाकीच्या केलेल्या कामाचे एक लाख रुपये द्यावेत अशी मागणी आरोपी अरविंद दिघे ग्रामसेवक अभिषेक बोत्रे यांच्याकडे करीत होता. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गावातील पाणीप्रश्नाच्या बैठकीला दोघेही भोरहून दुचाकीवर निघाले होते. बोत्रे दुचाकी चालवत होते तर आरोपी अरविंद दिघे पाठीमागे बसले होते. आंबेघरजवळ नीरा नदीच्या वळणावर आरोपीने बोत्रे यांच्या पाठीत चाकू खुपसला त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडली गेली. त्यानंतर दोघांची झटापट सुरु झाली आणि आरडाओरडा केला. आवाज ऐकून जवळच्या शेतात काम करणा-या शेतक-यांनी व ग्रामस्थांनी दोघांना पकडून ठेवले व पोलिसांना घटनेची कल्पना दिली. 

पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीस अटक करुन त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला. आणि बोत्रे यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान ग्रामसेवक संघटनेने शुक्रवारी (ता.१) दिवसभर पंचायत समितीच्या आवारात काम बंद आंदोलन करून घटनेचा निषेध केला. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जगताप, भोरचे अध्यक्ष संदीप धोत्रे सरचिटणीस महेशकुमार खाडे आदींसह सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. ग्रामसेवक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी संतोष हराळे यांना निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT