yin
yin sakal
पुणे

कोल्हापूरचा पार्थ देसाई बनला ‘यिन’ मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

पुणे: सकाळ माध्यम समूहाच्या(sakal media group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (yin) मुख्यमंत्रिपदी कोल्हापूरचा पार्थ देसाई, तर उपमुख्यमंत्रिपद बारामती येथील अल्लाउद्दीन बेग हे निवडून आले आहेत. ‘यिन’ मंत्रिमंडळात सभापतीपदी चंद्रपूरची गायत्री उरकूडे (चंद्रपूर) आणि विरोधी पक्षनेतेपदी मुंबईतील समृद्धी ठाकरे यांची निवड झाली आहे. लेखी व तोंडी परीक्षेची उमेदवारांकडून होणारी तयारी, उमेदवारांची कसोटी पाहणारे परीक्षकांचे प्रश्न, क्षणोक्षणी उमेदवारांची वाढणारी धाकधूक आणि निकालानंतरचा ‘जय महाराष्ट्र’, ‘हिप हिप हूर्रे...’चा जल्लोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात ही निवड प्रक्रिया(selection process) पार पडली.

‘यिन’च्या वतीने राज्यस्तरीय निवडणूक नुकतीच झाली. यात राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यामधून लेखी परीक्षा, मुलाखत आणि वक्तृत्व कौशल्य या कसोट्यांवर आधारित निवड प्रक्रियेमध्ये एकेक टप्पा पार करत पहिल्या फेरीत सर्वोत्कृष्ट आठ, दुसऱ्या फेरीत सर्वोत्कृष्ट चार उमेदवार निवडले गेले. आणि त्यांच्या अंतिम मुलाखतीतून मुख्यमंत्रिपदाचे दोन दावेदार आणि त्यांना झालेल्या मतदानाद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवड झाली. यावेळी ‘यिन’चे सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष या निवड प्रक्रियेत सहभागी झाले होते. सर्व उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यम व प्रकाशन केंद्राचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड, ‘यिन’चे संपादक संदीप काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यिन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. निवड प्रक्रियेसाठी परीक्षक म्हणून मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते भिमेश मुतुला, नांदेड येथील प्राध्यापक गजानन मोरे यांनी काम पाहिले.

पवार म्हणाले, ‘‘तरुणांचे संघटन, चळवळ म्हणून ‘यिन’ हे व्यासपीठ आहे. यात सहभागी झालेला प्रत्येक तरुण हा स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून पुढे आला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात चांगल्या नेतृत्वाची वणवा आहे. हेच नेतृत्व या माध्यमातून निर्माण होणार आहे, त्यामुळे तरुणांनी या व्यासपीठाकडे एक संधी म्हणून पहावे. अपेक्षा पूर्ण करताना आपल्याला आनंद मिळत आहे का? तसेच आपण दुसऱ्याच्या मनात आनंद फुलवत आहोत का?, याचाही विचार तरुणांनी करायला हवा. तुमच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी ‘यिन’चा उपयोग करा.’’ डॉ. जोगदंड म्हणाले,‘‘प्रभावी संवाद कौशल्य विकसित करा, इंग्रजी भाषा आत्मसात करा, माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान ठेवा, आत्मविश्वास बाळगा आणि प्रचंड मेहनत करा, ही पंचसूत्री वापरल्यास नक्कीच यश मिळेल.’’ सूत्रसंचालन काळे यांनी केले.

यिनचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. यानिमित्ताने राज्यातील युवकांसाठी काम करण्याचा मानस आहे. लवकरच महाराष्ट्र दौरा करून तरुणांचे प्रश्न समजावून घेणार आहे.

- पार्थ देसाई, (यिन, मुख्यमंत्री)

जास्तीत-जास्त युवकांना एकत्रित करून ‘यिन’शी जोडण्यासाठी योगदान देणार आहे. खेड्या-पाड्यात जाऊन तरुणांविषयक वेगवेगळे उपक्रम पोचविणे, तेथील तरुणांचे प्रश्न समजून घेणे, यावर लक्षकेंद्रीत करणार आहे.

- अल्लाउद्दीन बेग, (यिन, उपमुख्यमंत्री)

एकमेकांशी संवाद साधत प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे. तरुणांचे प्रश्न समजून घेते, त्याला योग्य न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यानिमित्ताने सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची संधी मिळेल.

- समृद्धी ठाकरे, (यिन, विरोधी पक्षनेते)

तरुणांचे प्रश्न समजून घेऊन, ते सोडविण्यासाठी काम करणार आहे. ‘यिन’च्या माध्यमातून विविध उपक्रम अधिकाधिक तरुणांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करेल.

- गायत्री उरकुडे,

(यिन, सभापती)

यिन मंत्रिमंडळाची यादी

मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री : पार्थ देसाई (कोल्हापूर)

उपमुख्यमंत्री, नगरविकास, अल्पसंख्याक विकास व औकाफमंत्री : अल्लाउद्दीन बेग (पुणे)

सभापती : गायत्री उरकुडे (चंद्रपूर)

विरोधी पक्षनेता : समृद्धी ठाकरे (मुंबई)

गृहमंत्री, सामान्य प्रशासन मंत्री : प्रशंसा जाधव (बुलडाणा)

अर्थमंत्री, पर्यावरण मंत्री : दिनेश बच्छाव (नाशिक)

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री : तुषार पोळ (नागपूर)

महिला व बालविकास मंत्री, नियोजन मंत्री : वैष्णवी पिल्लेवाड (जालना)

कृषी मंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री : अविनाश धायगुडे (औरंगाबाद)

सहकार मंत्री : सागर वाघ (नाशिक)

महसूल मंत्री : रोहित आगळे (पुणे)

क्रीडा मंत्री : योगीराज खांडे (बीड)

ऊर्जा मंत्री : रोहित साळुंके (धुळे)

उद्योग मंत्री : चेतन घोडरे (लातूर)

माजी सैनिक कल्याण मंत्री : अभिषेक गायकवाड (सातारा)

कुटुंब कल्याण मंत्री : चेतन लिम्हण (पिंपरी-चिंचवड)

ग्रामविकास मंत्री : उर्मिया काझी (नगर)

कामगार विकासमंत्री : सयागी जाधव (जळगाव)

कामगार मंत्री : तेजस देशमुख (रत्नागिरी)

जलसंपदा मंत्री : संतोष साखरे (नांदेड)

मत्स्य व्यवसायमंत्री : मिहीर तांबे (सिंधुदुर्ग)

गृहनिर्माण मंत्री : सौरभ धूत (जालना)

पशुसंवर्धनमंत्री : धनंजय माथेले (परभणी)

दुग्ध व्यवसाय विकासमंत्री : प्रवीण कोपर्डे (सांगली)

युवक कल्याणमंत्री, कला व साहित्य प्रोत्साहन मंत्री : महादेव मुजमुले (सोलापूर)

इतर मागासवर्गमंत्री, शहर विकास मंत्री : प्रेम लोणेरे (वाशीम)

सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गमंत्री : मयूर मराठे (नंदूरबार)

विमुक्त जाती व भटक्या जमाती मंत्री : सत्यजित लावंड (उस्मानाबाद)

विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री : चिराग काटेखाये (भंडारा)

खार जमिनी विकास मंत्री, ऊर्जा निर्मिती मंत्री : विश्वभूषण पाटील (वर्धा)

भूकंप पुनर्वसन मंत्री : आदित्य पंडित (ठाणे)

वद्यकीय शिक्षण मंत्री : विभूत सिंग (रायगड)

सांस्कृतिक कार्य मंत्री : संजय गिरी (मुंबई)

आदिवासी विकास मंत्री : अदनान मेमन (नंदुरबार)

वनमंत्री : सूरज चौधरी (गडचिरोली)

आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री : आदर्श औरटकर (चंद्रपूर)

पाणी पुरवठामंत्री : गौरव पटले (गोंदिया)

स्वच्छता मंत्री, शालेय शिक्षण मंत्री : आकाश हिवराळे (अकोला)

आदिवासी विकास मंत्री : विशाल राठोड (यवतमाळ)

रोजगार हमी मंत्री : अमित पवार (बुलडाणा)

फलोत्पादन मंत्री : वैष्णवी मुळे (औरंगाबाद)

परिवहन मंत्री : आकांशा तांबारे (पिंपरी-चिंचवड)

संदीय कार्यमंत्री : गायत्री सरोदे (अमरावती)

वस्त्रोद्योगमंत्री : राधिका पल्लवल (जळगाव)

अन्न व औषध प्रशासनमंत्री : प्रियांका दवणे (हिंगोली)

मृद व जलसंधारण मंत्री : निकिता परब (सिंधुदुर्ग)

सामाजिक न्यायमंत्री : वैष्णवी खताळ (पुणे)

पर्यटन मंत्री : रमेश भांगे (बीड)

राजशिष्टाचार मंत्री : संकेत वाकळे (धुळे)

माहिती व तंत्रज्ञान मंत्री : आकाश कोळी (लातूर)

माहिती व जनसंपर्क मंत्री : प्रणव पाटील (सांगली)

विधी व न्याय मंत्री : साईनाथ सूर्यवंशी (नांदेड)

वित्त मंत्री : अजरोद्दीन शेख (परभणी)

प्रवास व पर्यटन मंत्री : हरीश ढाणे (सातारा)

खनिकर्म मंत्री : आदित्य देशमुख (यवतमाळ)

मराठी भाषा मंत्री : रोहन शरबिद्रे (कोल्हापूर)

पोषण मंत्री : धनंजय देवाधे (नगर)

बंदरे विकास मंत्री : तन्मय राऊत (रत्नागिरी)

लघुउद्योग मंत्री : शुभम मिसाळ (सोलापूर)

जड उद्योग मंत्री : नुपूर माते (नागपूर)

मत्स व पशुपालन मंत्री : राजेंद्र चुटे (भंडारा)

संपत्ती अधिकार मंत्री : दिशा कुमावत (मुंबई उपनगर)

राज्य अंतर्गत सुरक्षा मंत्री : दीपाली शर्मा (ठाणे)

कर मंत्री, आर्थिक साहाय्य मंत्री : स्नेहल नरवडे (राजगड)

उच्च शिक्षण मंत्री : लक्ष्मी गोसाई (मुंबई शहर)

नैसर्गिक साधनसंपत्ती सुरक्षा मंत्री : अश्विनी पेंढारकर (गोंदिया)

ऐतिहासिक वारसा जतन मंत्री : ब्राजल गडपायले (गडचिरोली)

सामाजिक न्याय मंत्री : पवन गवई (अकोला)

माहिती तंत्रज्ञान मंत्री : शुभम बाजड (वाशीम)

क्रीडा व आत्मसुरक्षा मंत्री : साक्षी जाधव (पुणे ग्रामीण)

पर्यावरण सुरक्षा मंत्री : अभिजित काळे (अमरावती)

सामान्य प्रशासन मंत्री : सलमान पठाण (हिंगोली)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT