Kolhapur Sikandar Shaikh defeated Haryana Manjit Singh Khatri in 22 minutes
Kolhapur Sikandar Shaikh defeated Haryana Manjit Singh Khatri in 22 minutes esakal
पुणे

sikandar shaikh: पैलवान सिकंदर शेखने हरियानाच्या मनजितसिंग खत्रीला दाखवलं आसमान

रुपेश नामदास

वालचंदनगर: इंदापूर तालुक्यातील कळंबमध्ये झालेल्या लाल मातीमधील चुरशीच्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सिकंदर शेखने २२ मिनिटांमध्ये हरियानाच्या मनजितसिंग खत्री याला चितपट करून आसमान दाखवत प्रथम क्रमांकाची कुस्ती पटकावली.

कळंबमध्ये शुक्रवार (ता. ५) रोजी कै. बाबासाहेब फडतरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त लाल मातीमधील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रथम क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा पहिलवान भारत केसरी सिकंदर शेख व हरियानाचा पहिलवान मनजितसिंग खत्री यांच्यामध्ये झाली. २२ मिनिटे चाललेल्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये सिकंदर शेख याने मनजितसिंग खत्रीला इकझाक डावावरती चितपट करून आसमान दाखवले.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती इंदापूर तालुक्यातील सराटीच्या माउली कोकाटे याने जिंकली. कोकाटे याने पंजाबच्या सतेंद्रला आसमान दाखवले. तृतीय क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा पहिलवान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व कोल्हापूरचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यामध्ये रंगली. सुमारे ३० मिनिटे कुस्ती सुरु होती.

अखेर प्रेक्षकांनी दोघांची कुस्ती बरोबरीमध्ये सोडवली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती भारत केसरी माऊली जमदाडे व इराणचा पहिलवान मेहर इराणी यांच्यामध्ये झाली. जमदाडे याने इराणीला चितपट करून कुस्ती जिंकली.

या वेळी महिलांच्या ही मॅटवरील कुस्त्या पार पडल्या. पहिलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिलवानांचे मार्गदर्शक अण्णासाहेब पठारे, हिंदकेसरी योगेश बोंबाळे, महाराष्ट्र केसरी, छोटा रावसाहेब मगर, अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांनी हजेरी लावली.

कुस्ती स्पर्धेसाठी आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे, नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, मधुकर भरणे, लोकमंगलचे महेश देशमुख, नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार उपस्थित होते.

कुस्ती स्पर्धेचे आयोजन उद्योजक उत्तम फडतरे, दत्तात्रेय फडतरे, हनुमंत फडतरे यांनी केले होते. मल्लसम्राट रावसाहेब मगर, भीमराव माळी, विष्णू गोरे यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन प्रशांत भागवत, सुभाष दिवसे,प्रशांत चवरे यांनी केले.

यावेळी सोन्याची गदा व शिवराय केसरी किताब पटकाविणाऱ्या पहिलवान महेंद्र गायकवाड यांना फडतरे उद्योग समूहाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT