Korean Art Exhibition sakal
पुणे

Korean Art Exhibition : पुणे विद्यापीठातील कोरियन कला प्रदर्शनाला सुरुवात

भारत आणि कोरियाच्या राजनैतिक संबंधांची ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरिअन कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारत आणि कोरियाच्या राजनैतिक संबंधांची ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरिअन कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या (एसटीपी) वतीने आयोजित हे प्रदर्शन रविवार (ता.१५) पर्यंत खुले राहणार आहे.

विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहातआयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन के आर्ट इंटरनॅशनल एक्सचेंज असोसिएशनच्या अध्यक्ष हिओ सूक, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे अध्यक्ष दिलीप बंड, पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, आर्ट पुणे फाउंडेशनचे संजीव आणि प्रियंवदा पवार आदी उपस्थित होते.

सकाळी ११ ते सायं ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. प्रदर्शनासाठी आर्ट पुणे फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे. कोरियातील ३० चित्रकारांचे ८० मास्टरपिसेस पुणेकर रसिकांना अनुभविता येणार आहेत.

प्रदर्शनात कला प्रकारांचे विविध प्रकार आणि शैली अनुभविता येणार असून यामध्ये अमूर्त, लँडस्केप, प्रभाववादी, समकालीन चित्र शैलींचा समावेश असेल. ही सर्व चित्रे तैल, जलरंग, ऍक्रेलिक, थ्री डी आणि संमिश्र माध्यमातील असणार आहेत. कला संग्राहकांसाठी हे प्रदर्शन एक पर्वणी ठरेल. किम इनजून हे सदर कला प्रदर्शनाचे संचालक असून सचिन गुप्ता आणि पार्क सोयुंग हे क्युरेटर म्हणून काम पाहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीकडे रवाना

Ajit Pawar: कार्यकर्त्यांच्या शब्दाला मान देणारा नेता; पदाधिकाऱ्यांकडून दादांच्या आठवणींना उजाळा

Ajit Pawar Death: आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

Ajit Pawar Passed Away: अलविदा दादा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राज्यात शोकाकूल वातावरण

Pathardi News: अजितदादा दहा मिनिटे आले अन् प्रश्न सोडवून गेले

SCROLL FOR NEXT