PMP Bus Sakal
पुणे

Vijaystambh Sohala : 'पीएमपी'कडून विजयस्तंभ मानवंदनेसाठी ३७० बसचे नियोजन

पीएमपी प्रशासनाने कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष बस सेवेचे नियोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पीएमपी प्रशासनाने कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष बस सेवेचे नियोजन केले आहे.

पुणे - पीएमपी प्रशासनाने कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष बस सेवेचे नियोजन केले आहे. यंदाच्या वर्षी ३७० बस सोडण्यात येणार आहे. पैकी २८० बसची मोफत सेवा असून उर्वरित ९० बस या पुणे व पिंपरी च्या विविध भागातून कोरेगाव - भीमा येथे येणार आहेत.नागरिकांच्या संख्येचा विचार करता पीएमपी प्रशासनाने मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बसच्या संख्येत वाढ केली.

पीएमपी प्रशासनाने ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी दोन दिवस बसचे नियोजन केले आहे. शनिवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १ जानेवारीच्या सकाळी ६ वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान येथून ४० बस, वढू फाटा (इनामदार हॉस्पिटल) ते वढू करिता ५ बस व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड तेभीमा कोरेगाव पर्यंत ३५ बसची अशा एकूण ८० मोफत (विनातिकीट) बसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच १ जानेवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजे पर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ,फुलगाव शाळा ते पेरणे टोल नाका पर्यंत १४० बसेस व शिक्रापूर रोड (तोरणा हॉटेल) ते भीमा कोरेगाव पर्यंत ११५ बस आणि वढू फाटा ते वढू पर्यंत २५ बस अशा एकूण २८० मोफत (विनातिकीट) बसचे नियोजन केले आहे.

प्रवासी भाडे देऊन बस सेवा :

कुठून बसची संख्या

१ पुणे स्टेशन ३८

२ मनपा भवन ३५

३ दापोडी मंत्री निकेतन ०२

४ ढोले पाटील रोड मनपा शाळा ०२

५ अप्पर डेपो बस स्थानक ०४

६ पिंपरी आंबेडकर चौक ०३

७ भोसरी स्थानक ०४

८ हडपसर स्थानक ०२

यात नियमित ५५ व जादा ३५ असे मिळून एकूण ९० बस कोरेगाव भीमासाठी नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Elections: प्रचाराला आणलेल्या महिला प्रतिस्पर्धी उमेदवाराने पळवल्या, पण पैसे न दिल्याने तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

US Tariff On India : रशियन तेलावरून वाद पेटला; भारतावर 500% टॅरिफ? ट्रम्प यांचा मोठा निर्णय

IND vs NZ : तिलक वर्माच्या जागी T20 संघात कोणाला मिळणार संधी? ऋतुराज गायकवाडसह मुंबईकर फलंदाज शर्यतीत, कोण मारणार बाजी?

पुण्यात तडीपार माजी आमदार भाजप उमेदवाराच्या प्रचारात; काँग्रेस नेत्यानं CCTV फूटेज दाखवत केले आरोप

ZP Election : झेडपी निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार; १२ जिल्ह्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT