kothrud covid patient died at home ambulance unconscious wife 
पुणे

कोथरूडमध्ये कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू; बेशुध्द पत्नीसाठी 3 तासांनी आली अ‍ॅम्ब्युलन्स

जितेंद्र मैड

कोथरूड : त्रास होतोय म्हणून डॉक्टरचा सल्ला घेत पती-पत्नींनी कोविड तपासणी केली. पण, रिपोर्ट हातात येण्यापूर्वीच पतीचे निधन झाले. हा धक्का सहन न झाल्याने पत्नी बेशुध्द पडली. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी साडेदहा पासूनच फोनाफोनी करत रुग्णवाहिका बोलावली. परंतु, रुग्णवाहिका पोहचायला तीन तास लागले. प्रशासनाच्या या ढीम्म कारभारामुळं नागरिकांनी चीड व्यक्त केली. प्रमोदकुमार मंडल, (वय ३९ रा. केळेवाडी, हनुमाननगर गल्ली नं.१५) असे निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी नीरुदेवी मंडल यांना ससूनमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्या शुध्दीवर आल्या आहेत. त्यांचा कोविड अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत मंडल यांच्या शेजारी राहणा-या किर्ती ओव्हाळ म्हणाल्या की, तब्येत बरी नव्हती म्हणून, मंडल यांनी प्रथम सोमवारी तपासणी केली. लवकर अहवाल आला नाही. म्हणून खासगीमध्ये त्यांनी दुसरी तपासणी केली. त्याचा अहवाल मंडल यांचा मृत्यू झाल्यानंतर आला. त्यांच्या पत्नी बेशुध्द झाल्याचे कळताच आम्ही हर्षवर्धन मानकरांना कळवले. त्यांचे कार्यकर्ते आल्यावर यंत्रणा हलली. नगरसेविका छाया मारणे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप कानडे यांनी सातत्याने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावत मंडल यांना उपचार मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मंडल यांचे सहकारी रुपेश तावरे म्हणाले की, तपासणी अहवाल मिळण्यात होणारा उशीर हा रुग्ण संख्या वाढवण्यास कारणीभूत होत आहे. प्रत्येक गरजूला वेळेवर आरोग्यसेवा मिळावी. ब्लेम गेम नको.

नगरसेविका छाया मारणे म्हणाल्या, 'नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. रुग्णवाहिकेची मागणी करुनही प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य मिळाले नाही. अशीच अवस्था राहीली तर माणसांचे जगणे अवघड होईल.' नगरसेवक दीपक मानकर म्हणाले, 'या भागात तातडीने कोविड सेंटर सुरू करावे. महापालिकेने आरोग्य कर्मचा-यांची तातडीने भरती करावी. जेणेकरुन आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण कमी होईल. कोविड तपासणी अहवाल येण्यास जो विलंब लागतो आहे तो कमी कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. नागरिकांनीही स्वतःची काळजी घेत कोरोना नियमांचे पालन करावे. त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. आजार लपवून स्वतःबरोबर इतरांचेही आरोग्य धोक्यात आणू नये.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Dham Temple Tragedy : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू; गर्दीत विजेची तार पडली अ्न...

Jaggery Industry Law: गूळ उद्योगासाठी आता स्वतंत्र कायदा; साखर आयुक्तालय सुधारित मसुदा शासनाकडे पाठविणार

Nashik Sisters Drown : आई लगेच येईल, सांगून डॉक्टर बाबा दवाखान्यात गेले; 2 चिमुकल्या मुलींचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : जोतिबा डोंगरावर आज श्रावणषष्ठी यात्रा; महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यांतून तीन ते चार लाख भाविक येणार

Maharashtra Contractors Dues: कंत्राटदारांचे ८६, ६६२ कोटी थकीत; आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन; राज्य कंत्राटदार फेडरेशनचा निर्णय

SCROLL FOR NEXT