Koyta Gang Esakal
पुणे

Koyata Gang Pune : पुण्यात कोयता गँगकडून पुन्हा 'भाईगिरी' दोन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

वसाहतीत गुंड टोळक्याने २६ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

Koyata Gang Pune - सहकार नगरमधील तळजाई परिसरात कोयता गँगकडून पुन्हा 'भाईगिरी' करत दहशत माजविण्याची घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच तळजाई वसाहतीत गुंड टोळक्याने २६ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी माऊली शिंदे (वय १९, रा. तळजाई वसाहत) याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर रंगनाथ आरडे (वय २२), रोहन उर्फ गायसोन्या राजू आरडे (वय २१), ऋषीकेश उर्फ बारक्या संजय लोंढे (वय २३), जयेश उर्फ जयड्या दत्ता ढावरे (वय १८), वृषभ शंकर कांबळे (वय २३), अनिकेत उर्फ गुड्डू रवींद्र शिंदे (वय २४), आकाश मनोज डाकले (वय २३), आदित्य उर्फ सँडी पद्माकर डाकले (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली शिंदे आणि त्याचा मित्र पाच जुलै रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास तळजाई वसाहत परिसरात उभे होते.

त्या वेळी दहा ते बारा जणांच्या टोळक्याने कोयते हवेत फिरवत 'तुम्ही या भागातील भाई झाले का', असे म्हणत एका टपरीची तोडफोड केली. तसेच, नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजवली. 'आम्ही या भागातील भाई आहोत. आमच्या नादाला लागाल, तर जीवे ठार मारु', अशी धमकी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT