Koyta gang in Sinhagad road area young man arrested female police pune crime  esakal
पुणे

Pune Crime : सिंहगड रस्ता परिसरात कोयता गँगचा धुमाकूळ

लग्न समारंभात झालेल्या वादातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करून कॅफेमध्ये तोडफोड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लग्न समारंभात झालेल्या वादातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करून कॅफेमध्ये तोडफोड केली. ही घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात एका कॅफेमध्ये बुधवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.

या प्रकरणी सागर दिलीप लोखंडे (वय ३२, रा. स्वामी नारायण मंदिरामागे, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सिंहगड पोलिसांनी करण जांभळे, गणेश खांडेकर, मोन्या सुर्वे, मयूर परब, अक्षय बारगजे यांच्यासह दोन ते तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर यांचा मित्र ऋषिकेश याच्या लग्न समारंभात आरोपींशी किरकोळ कारणावरुन आरोपी मोन्या सुर्वे याच्याशी वाद झाला होता.

हा वाद मिटल्यानंतर सागर आणि त्याचा मित्र ऋषीकेश हे रात्री नऱ्हे परिसरातील कॅफेत जेवण करण्यासाठी गेले. त्या वेळी आरोपी मोन्या सुर्वे आणि साथीदार तेथे आले. त्यांनी कोयते उगारुन दहशत माजवीत सागर याच्या डोक्यात आणि मनगटावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच, कॅफेमधील खुर्च्यांची तोडफोड करून आरोपी पसार झाले.

महिला पोलिस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की, तरुणाला अटक

एका तरुणाने महिला पोलिस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की केल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शिवप्रसाद लॉजजवळ घडली. या प्रकरणी एका ३३ वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अनुराग माळवदकर (वय ३६, रा. मोरे वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पोलिस कर्मचारी ह्या दुचाकीवरून घरी जात होत्या. त्यांनी सिग्नलला दुचाकी पुढे घेतली असता आरोपीने महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली. तसेच, त्याने महिलेचा हात पिरगाळून विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT