potato.jpg 
पुणे

...म्हणून शेतकऱ्यांवर आली बटाटे उपसून काढण्याची वेळ

जयदीप हिरवे

सातगाव पठार (पुणे) : परिसरातील बटाटा पिकाची काढणी सुरू झाली आहे. मात्र, सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहत असल्याने ट्रॅक्‍टरने अथवा बैल जोडीने बटाटे काढणे शक्‍य होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी मिळेल तसे मजुरांची व्यवस्था करून अक्षरक्ष हाताने बटाटे उपसून काढत आहे. मात्र, उत्पादित बटाटे चांगले निघत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात सर्वाधिक बटाटा लागवड सातगाव पठार भागात केली जाते. पडणाऱ्या पावसावरच येथील शेती व बटाटा पीक अवलंबून आहे. येथे बटाटा काढणीसाठी अनेक ठिकाणांहून परिसरातील मजूर येतात. मात्र, या वर्षी करोनाच्या संसर्गामुळे मजुरांची टंचाई भासत आहे. येथील सात ते आठ हजार एकर शेती क्षेत्रात बटाटा लागवड झाली आहे. काढणीला आलेला बटाटा हा वेळेतच काढावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव व मजुरांची कमतरता असली तरी सोशल डिस्टन्सचा वापर करून वेळेतच बटाटा काढणी सुरू केली आहे. 
 

कोरोनामुळे मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे घरातील उपलब्ध माणसे व काही मजूर आणून ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने बटाटा काढणी चालू आहे. एका मजुरांच्या जोडीला एका दिवसासाठी साधारणतः 500 ते 600 रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागते. मजुरीचा खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात वाढ होणार आहे. 
- विकास बारवे, बटाटा उत्पादक शेतकर, कुरवंडी (ता. आंबेगाव) 

 

सध्या मजुरांची कमतरता असली, तरी वेळेतच बटाटा पिकाची काढणी सुरू केली आहे. मात्र, पावसामुळे काढणीची कामे ठप्प होत आहेत. सध्या रोजच पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. त्यामुळे जर अधिकच पाऊस झाला, तर बटाटा काढणीची कामे काही दिवसांसाठी ठप्प होतील. मात्र, त्यामुळे बटाटा पिकास धोका निर्माण होऊ शकतो. 
- अनिल एरंडे, बटाटा उत्पादक शेतकरी, कोल्हारवाडी (ता.आंबेगाव) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT