Pune Undri Labour Camp Murder Over Bad Food esakal
पुणे

Pune Murder: जेवण आवडलं नाही म्हणून आचाऱ्याच्या डोक्यात घातला हातोडा! उंड्रीमधील कॅन्टीनमध्ये दिवसाढवळ्या खून

Undri Crime News: उंड्री परिसरातील रहेजा मिलेनियम गृहप्रकल्पाच्या लेबर कॅम्पमधील कॅन्टीनमध्ये ही घटना घडली. यात एक कामगार देखील जबर जखमी झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १५ : जेवणाची चव न आवडल्यामुळे बांधकाम मजुराने आचाऱ्याच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केला. तसेच, आरोपीने आणखी एका मजुराच्या डोक्यात हातोडा मारल्याने तोही जखमी झाला. ही घटना उंड्री परिसरातील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या लेबर कॅम्पमध्ये घडली.

(Pune Crime News)

भुवन सस्तीक सरकार (वय ६२) असे खून झालेल्या आचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. कमल नारायण मारडी (वय ४९, रा. जलघर जियापुर, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री परिसरातील महम्मदवाडी भागात रहेजा मिलेनियम गृहप्रकल्पाच्या लेबर कॅम्पमध्ये कॅन्टीन आहे.

रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सरकार यांनी बांधकाम मजुरांसाठी जेवण तयार केले. परंतु जेवणाची चव न आवडल्याने मारडी आणि सरकार यांच्यात वाद झाला. त्यावर आरोपी मारडीने आचारी सरकार यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर हातोड्याने वार केले. तसेच, रामप्रीत मंडल याच्याही डोक्यात हातोड्याने वार केला.

याबाबत माहिती मिळताच कोंढवा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सरकार यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल करून आरोपी मारडीला अटक केली.

(Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT