corona1.jpg 
पुणे

पुण्यातील नामांकित हॉस्पिटल... ती महिला डॉक्टर अन्....

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला येथे राहणारी व शनिवार वाड्याजवळील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरी करणारी महिला डॉक्टर 17 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळली; परंतु तीन दिवस उलटून गेले तरी पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला देण्यात आलेली नसल्याने पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर आला आहे.
घाबरु नका; तुमच्यासाठी इथे नोकरी उपलब्ध आहे; राज्य शासनाचा उपक्रम

सदर महिला डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह असल्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होती. परंतु, खडकवासला आरोग्य केंद्र अधिकारी वंदना गवळी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. अधिकृत माहिती मिळत नसल्याने सदर महिला डॉक्टर रहात असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात न आल्याने सरकारी यंत्रणांच्या समन्वयाअभावी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होतो की काय? ही भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली दिसून आली. 'सकाळ'च्या माध्यमातून 'त्या' हॉस्पिटलशी याबाबत संपर्क साधला असता, "17 जूनच्या रात्री सदर महिला डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 18 जून रोजी सदर रिपोर्ट महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला ई-मेल द्वारे कळविण्यात आले. रुग्णालयाच्या वतीने कोणताही हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही, "अशी माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली .
     

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डाॅ. वंदना गवळी व खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांच्याकडून सदर महिला डॉक्टरच्या पतीकडे याबाबत विचारणा केली जात होती. परंतु, तो खरी माहिती लपवत होता. अखेर नागरिकांमध्ये चर्चा वाढल्याने व 'सकाळ'ने पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने याबाबत दखल घेऊन खरी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. खातरजमा झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डाॅ वंदना गवळी, हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते, सरपंच सौरभ मते, पोलीस पाटील ऋषिकेश मते, कामगार तलाठी धनश्री हिरवे यांनी सदर महिला डॉक्टर राहत असलेल्या इमारतीची व परिसराची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाय योजनेला सुरुवात केली. दरम्यान आता खडकवासला परिसरात खडकवासला गावातील दोन व लष्कर हद्दीतील डीआयएटी येथील एक अशा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT