kothrud.jpg 
पुणे

कोथरुडमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये हे काय घडते आहे...

सकाळवृत्तसेवा

कोथरुड : छत्रपती संभाजी विदयालय कोथरुड येथे क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी पुरेशा सुविधा नसल्याची तक्रार केली आहे. या संदर्भात पतित पावन संघटनेच्या शरद देशमुख, सुनिल मराठे, जालिंदर टेमघरे यांनी आयुक्तांकडे नागरीकांची चांगली व्यवस्था करता येत नसेल तर घरीच क्वारंटाईन करा असे निवेदन दिले आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, क्वारंटाईन करण्यात आलेल्यांच्या गाद्या चादरी बदलल्या जात नाहीत, पिण्याचे पाणी. सॅनीटायझरची व्यवस्था नाही, स्वच्छता नाही असा आरोप केला आहे.

विद्यालयात क्वारंटाईन केलेले संतोष शेंडगे यांनी सांगितले की, ''आम्हाला येथे क्वारंटाईन केले तेव्हा लक्षात आले की, येथून याअगोदर निघून गेलेल्या क्वारंटाईन लोकांच्या गाद्या स्वच्छ केलेल्या नाहीत. औषध फवारणी झालेली नाही. येथे पाणी प्यायची सोय नव्हती. स्वच्छता नव्हती. नळ व स्वच्छतागृहापाशी सॅनिटायझर नव्हते. स्वच्छतागृहात पाण्यासाठी भांडे नव्हते. एकाच खोलीत अनेक लोकांना राहण्यास ठेवले होते. आमच्या पैकी एक जरी कोरोना पॉझीटीव्ह असेल तर त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका आहे. क्वारंटाईन सेंटर मधील या त्रुटी दुर करण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा संसर्ग वाढेल.''

संभाजी विदयालयात २३ खोल्या असून, ९२ लोकांची राहण्याची सुविधा आहे. परंतु येथे ९९ लोक ठेवण्यात आले आहेत. सध्या कोथरुडमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून क्वारंटाईन करण्यात येणारांची संख्याही वाढत आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्यापैकी काहींना कोरोना असण्याची शक्यता असते. एकाच सेंटरवर जेव्हा जास्त लोक ठेवले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये पुरेसे अंतर राहील, एकमेकाचा संसर्ग होणार नाही याची काळजी क्वारंटाईन झालेल्यांनीपण घेणे अपेक्षित आहे. तसेच सेटंरची स्वच्छता राखणे, वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. जनता व प्रशासन यांनी योग्य सहकार्य न केल्यास रुग्ण संख्या वाढण्याची भीती नागरीक व्यवक्त करत आहेत. दरम्यान, आज सकाळी येथे सॅनिटायझर, पाणी आदी सुविधा पुरविण्यात आल्या असे शेंडगे यांनी सांगितले. 

शनिवारी संध्याकाळपर्यंत कोथरूडमधील कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णसंख्या 
प्रभाग १०- ५५
प्रभाग ११- ५२
प्रभाग १२-९
असे एकूण ११६ लोक आजपर्यंत कोरोना पॉझीटीव्ह आढळले. यातील ३८ रुग्ण कोरोनामुकत झाले. ५ जणांचा मृत्यु झाला तर ७३ जण कोरोना पाॅझिटीव्ह आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT