beds.jpg 
पुणे

दौंडमध्ये ऑक्सिजन बेडचा तुटवडा; कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांची धावपळ  

सकाळवृत्तसेवा

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोरोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी निश्चित करण्यात आलेले सर्व 64 ऑक्सिजन बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नवीन रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड शिल्लक नाहीत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या पंधराशेपार गेली आहे.

 
दौंड शहरातील उप जिल्हा रूग्णालयात 29 ऑक्सिजन बेड, शहरातील दोन खासगी अधिग्रहीत रुग्णालयांमध्ये 25; तर केडगाव (ता. दौंड) येथील एका खासगी अधिग्रहीत रूग्णालयात 10, असे एकूण 64 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. वाढता प्रादुर्भावामुळे सर्व 64 ऑक्सिजन बेडवरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नव्याने येणाऱ्या व ऑक्सिजन बेडची आवश्यकता असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना पुणे किंवा बारामती येथे ऑक्सिजन बेड शोधावे लागत आहेत. 

दौंड तालुक्यात 10 सप्टेंबरअखेर 1499 जणांना कोरोनाची बाधा झाली, तर एकूण 37 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर 1023 जण बरे झाले आहेत. सध्या एकूण 440 बाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॅा. सुरेखा पोळ- कांबळे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : उकाड्याने हैराण पुणेकरांना अखेर दिलासा! सिंहगड, कोथरूडमध्ये रिमझिम सरी, विश्रांतवाडीतही पावसाची हजेरी

BEST Strike: 'बेस्ट'कामगार थेट विधानभवनावर धडकणार; २५ हजार कामगार रस्त्यावर उतरणार, कृती समितीचा इशारा, मुंबईत हायअलर्ट!

Bihar Uranium Scare Explained: बिहारमधील आईच्या दुधात युरेनियम असल्याचा दावा अखेर खोटा ठरला? BARC च्या अहवालातून मोठा खुलासा

PF खातेदारांसाठी खुशखबर! कारण न देता मिळणार PFची संपूर्ण रक्कम? जाणून घ्या नवा नियम

India Squad Change: भारताच्या T20I संघात अचानक बदल! स्टार खेळाडू अचानक संघातून बाहेर, BCCI ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT