पुणे

पुणे : नागरिकांची संख्या 40 हजार अन् पोलिस फक्त 28

सकाळवृत्तसेवा

कामशेत : लोकसंख्या चाळीस हजारांवर आहे. पण नागरिकांची सुरक्षितता फक्त 28 पोलिसांवर आहे. कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत अधिकारी व कर्मचाऱ्यांची 33 पदे रिक्त आहेत. त्यामुळे अपेक्षित सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुढे आला आहे.

कामशेत येथे 17 सप्टेंबर 2017 मध्ये पोलिस ठाण्याची स्थापना झाली. स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा मिळाल्यावर आत्तापर्यंत 61 कर्मचारी मंजूर करण्यात आले असून, फक्त 31 कर्मचारी कार्यरत आहेत. पोलिस ठाण्याच्या स्थापनेपासून कधीच मंजूर पदांची पूर्तता पोलिस ठाण्यात झालेली नाही. सध्या एक पोलिस निरीक्षक, 2 पोलिस उपनिरीक्षक, 3 सहाय्यक फौजदार, 7 पोलिस हवालदार, 5 पोलिस नाईक, 7 पोलिस कॉन्स्टेबल, 2 महिला पोलिस व 2 वाहनचालक कार्यरत आहेत. तर 
एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, 2 पोलिस निरीक्षक, 3 सहाय्यक फौजदार, 6 पोलिस हवालदार, 8 पोलिस नाईक, 10 पोलिस कॉन्स्टेबल ही पदे रिक्त आहेत.

मावळातील जनता शांत आणि संयमी असल्याने ते पोलिस मित्र म्हणून वागत आली आहे , तर दुसरीकडे खाकीचा दरारा खेडोपाडी आजही कायम आहेच, तिचा मानसन्मान राखलाही जातो ही वस्तुस्थिती असली तरी जनतेच्या सुरक्षिततेला विसरून चालणार नाही. तसेच खाकीतील कर्मचाऱ्यांनाही एक दिवसाच्या साप्ताहिक सुट्टीची अपेक्षा आहे हे ही गृहीत धरायला पाहिजे.

मुख्य बाजारपेठ असल्याने  नागरिकांची बाजारपेठेत कायम वर्दळ असते. वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. शाळा महाविद्यालयात कायदा व सुव्यवस्था राखणे पोलिसांच्या जिकरीचे ठरत आहे. पेट्रोलिंग करण्यात अडचणी येत आहे.

निवडणुका, सण, समारंभ, मिरवणुका बंदोबस्त देण्यासाठी कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. महामार्गावर होणारे अपघात व लुटमरीचे गुन्ह्ये व खुनाच्या गुन्ह्यातील तपास करण्यात उपलब्ध कर्मचारी गुंतलेले असतात.

अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची साप्ताहिक सुट्टी देखील मिळणे, अवघड झाले आहे. पोलिस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT