luccky drow sakal
पुणे

महिलांनो, सावधान !! ‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली होतेय फसवणूक

पैसे घेतल्यानंतर कंपन्या पसार; तक्रार दाखल करण्याचे पोलिसांचे आवाहन

पाडुरंग सरोदे

पुणे : महागडा फ्रिज, मोठ्या स्क्रीनचा एलईडी टिव्ही... वॉशिंग मशिन... अशा वस्तु एका ‘लकी ड्रॉ’द्वारे मोफत मिळणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी ‘लकी ड्रॉ’च्या कुपनसाठी एक ते दोन हजार रुपये घेऊन कुपन दिले जाते. दोन दिवसांनी तुम्हाला त्या वस्तु मिळतील, असे सांगून सर्वसामान्य कुटुंबांमधील महिलांच्या लुबाडणुकीचे प्रकार शहरात सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे सावधान राहून असे प्रकार घडत असल्यास तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Pune News)

टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मोबाईल अशा महागड्या गृहपयोगी इलेक्‍ट्रॉनिक वस्तु एकदाच खरेदी करणे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील व्यक्तींना शक्‍य होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दरमहा हफ्त्यावर अशा वस्तु खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, वर्षभरापासून नेमक्‍या अशा व्यक्तींना लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. वेगवेगळ्या भागांमध्ये काही कंपन्यांचे सेल्समन, सेल्सगर्ल फिरत असून त्यांच्याकडून महिलांची फसवणूक होत आहे.

अशी आहे फसवणुकीची पद्धत !

स्वच्छ राहणीमान, उत्तम संवादशैलीद्वारे संबंधित तरुण-तरुणी महिलांना त्यांच्याकडील ‘लकी ड्रॉ’मध्ये सहभाग घेण्यासाठी भुरळ घातली जाते. प्रारंभी २० रुपये घेऊन महिलांना ‘लकी ड्रॉ’चे कुपन दिले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित महिलांना महागड्या गृहपयोगी इलेक्‍ट्रॉनिक वस्तु लागल्याचे सांगून त्यांच्याकडून एका वस्तुमागे एक ते सात हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात.

या वस्तु दुसऱ्या दिवशी आणून देतो, असे सांगून सेल्समन, सेल्सगर्ल निघून जातात. त्यानंतर महिलांना त्या वस्तु आणि त्यांनी दिलेले पैसेही कधी मिळत नाहीत. संबंधित कंपनीचे कार्यालय त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळून येत नाही, तसेच त्यांच्याकडून फोनलाही प्रतिसाद दिला जात नाही.

त्यामुळे संसारातून एक-एक पै काढून अडचणीसाठी साठविलेले पैसे अशा पद्धतीने अनोळखी व्यक्तींकडून काढून नेण्याच्या प्रकारामुळे कष्टकरी महिला हवालदिल झाल्या आहेत. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलांनी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पुणे स्टेशन येथील ताडीवाला रोड परिसरातील महिलांची यात सर्वाधिक फसवणूक झाली आहे.

पुणे स्टेशन येथील ताडीवाला रोड परिसरामध्ये ‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याची तक्रार अद्याप आलेली नाही. मात्र, नागरीकांनी तक्रार केल्यास त्याची तत्काळ दखल घेऊन फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. - यशवंत गवारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंडगार्डन पोलिस ठाणे

काही दिवसांपूर्वी दोन तरुणी आल्या. त्यांनी आमच्याकडून २० रुपये घेऊन एक ‘लकी ड्रॉ’ कुपन दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन मला फ्रिज, टिव्ही लागल्याचे सांगितले. माझ्याकडून चार हजार रुपये घेतले, त्यानंतर दोन दिवसांनी वस्तु घेऊन येतो, असे सांगून गेल्या. त्यानंतर त्या पुन्हा आल्याच नाहीत. माझ्याप्रमाणे आमच्या येथील ४० ते ५० महिलांची फसवणूक झाली आहे. - शीतल कांबळे, नोकरदार

कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यापासून शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सेल्समन, सेल्सगर्ल फिरत आहेत. महिलांना महागड्या वस्तु देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून दोन ते १० हजार रुपये इतकी रक्कम घेतात. त्यानंतर पुन्हा त्या व्यक्ती, त्यांची कंपनी मिळून येत नाही. अशा प्रकारे शेकडो नागरिकांची फसवणूक झाली आहे. - श्याम गायकवाड, अध्यक्ष, भीमछावा संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: नाशिकचा गोलंदाज इतिहास घडवतोय! 'अशी' कामगिरी करणारा महाराष्ट्राचा पहिला गोलंदाज ठरला

Pregnancy Criminalization Case : बाळाचा गर्भातच मृत्यू, महिलेला १८ वर्षांची शिक्षा, पण आता या एका दाव्याने निकाल पलटला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Update : गोरेगाव विधानसभेत शिंदे गटाची बंडखोरी

Happy New Year 2026 Wishes: नववर्ष 2026 ची सुरुवात करा प्रेमाने! मित्र-परिवाराला पाठवा मनापासूनच्या शुभेच्छा, वर्ष होईल खास

Bank Holiday : आज वर्षाचा शेवटचा दिवस! ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला बँका बंद की सुरू? बँकेत जाण्याआधी हे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT