Lakh rupees Fraud with sugarcane Farmers in loni kalbhor Pune by Trader 
पुणे

 गुऱ्हाळाला ऊस नेतो सांगून व्यापाऱ्याचा घातला लाखोंचा गंडा; 50 पेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

जनार्दन दांडगे.

उरुळी कांचन (पुणे)- गुऱ्हाळाला नेलेल्या ऊसाचे पैसे परस्पर खर्च करुन, दौड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीमधील पन्नासहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीचा प्रकार मागील तीन ते चार महिण्याच्या काळात घडलेला आहे. 

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अर्जुण गायकवाड, गणपत चावट, बाबुलाल मोमीन, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, रामभाऊ गायकवाड, शंकर खोले ही फसवणुक झालेल्या प्रमुख ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नावे आहेत. 

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना मागील दहा पासुन बंद असल्याने, पु्र्व हवेलीमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दौंड व शिरुर तालुक्याताल साखऱ कारखान्यावर अंवलबुन रहावे लागते. लोणी काळभोर, उरुळी कांचन परीसरात गुऱ्हाळे चालु असली तरी, पुर्व हवेलीमधील ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने दरवर्षी शेकडो एकर ऊस गाळपाविना शेतकऱ्यांना सोडून द्यावा लागत आहे. यामुळे मिळेल त्या भावाने, मिळेल त्या व्यापाऱ्याला उस देण्याची वेळ पुर्व हवेलीमधील शेतकऱ्यांच्यावर दरवर्षी येत असते. त्यातच चालु वर्षी पुर्व हवेलीत ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने, दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ चालकाचे अनेक दलाल ऊसासाठी हवेली तालुक्यात फिरत आहेत. अशाच दलालापैकी एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे परस्पर खर्च करुन शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार पुढे आला आहे.

याबाबत बोलतांना कदमवाकवस्ती येथील ऊस उत्पादक शेतकरी अर्जुण गायकवाड म्हणाले, ''लॉकडाऊन काळात दौड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने कदमवाकवस्ती परिसरातील पन्नासहुन अधिक शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळाला नेला होता. वरील सर्वच शेतकऱ्या्ंचे ऊसाचे पैसे वेळेवर मिळाल्याने, आमच्या सारख्या पंचविसहुन अधिक शेतकऱ्यांनी मागिल तीन महिण्याच्या काळात वरील व्यापाऱ्याला ऊस दिला होता. मात्र मागिल तीन महिण्याच्या काळात नेलेल्या ऊसाचे पैसे देण्यास संबधित व्यापाऱ्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. मागील तीन महिण्याच्या काळात वारंनार मागणी करुनही, व्यापारी वेगवेगळी उत्तरे देऊन शेतकऱ्यांना भेटण्याचे टाळत आहे. व्यापाऱ्याने दौंड तालुक्यातील ज्या ज्या गुऱ्हाळ चालकांना आमचा ऊस दिला अशा सर्व गुर्हाळ चालकांची भेट घेतली असता, व्यापाऱ्याने पैसे ऊसाचे पैसे परस्पर उचललल्याची माहिती मिळत आहे. 

हे ही वाचा : पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान अर्जुण गायकवाड पुढे म्हणाले, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतीलच नव्हे तर लोणी काळभोर, उरुळी कांचनसह या परीसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांचा ऊस वरील व्यापाऱ्याने नेला असल्याची माहिती मिळत आहे. वारंवार संपर्क साधुनही व्यापारी भेटत नसल्याने, शेतकऱ्यांनी लोणी काळभोर पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज (मंगळवारी) लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांची भेट घेऊन, व्यापाऱ्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT