lalit patil Esakal
पुणे

Lalit Patil Arrested: भागकर जाएगा कहां ? पोलिसांना होता विश्वास, अखेर सापडलाच फरार ललित पाटील

वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पोलिसांना चकवा देऊन तो फरार झाला होता.

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे - ससून रुग्णालयातून फरार झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अखेर चेन्नईतून अटक केली. ललितला पकडण्यासाठी पुणे, मुंबई आणि नाशिक पोलिसांची पथके त्याच्या मागावर होती.

ललित अनिल पाटील (वय ३४, रा. नाशिक) याची चाकण येथील अमली पदार्थ विक्री प्रकरणात येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर जून महिन्यात त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुख्य आरोपी ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पोलिसांना चकवा देऊन तो फरार झाला होता. ललित पाटील हा साकीनाका पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यातही मुख्य आरोपी आहे.

ससून रुग्णालयाच्या परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सुमारे सव्वादोन कोटींचे मेफेड्रोन अमली पदार्थ जप्त केले होते. या गुन्ह्यात मुख्य आरोपी ललित पाटीलसह त्याचा साथीदार सुभाष मंडल (वय २९, रा, देहू रस्ता, मूळ रा. झारखंड) आणि ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचारी रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) या दोघांना अटक करण्यात आली होती.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपी ललित पाटील याला कोणत्याही परिस्थितीत अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेसह विविध पथके महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह आणि परराज्यांत रवाना केली होती. पुणे पोलिसांनी ललितचा भाऊ आणि अमली पदार्थ तस्कर प्रकरणातील मास्टरमाईंड भूषण सुभाष पाटील (रा. नाशिक) आणि अभिषेक विलास बलकवडे या दोघांना भारत-नेपाळ सीमेवरून अटक केली होती. त्यानंतर मुख्य आरोपी ललित याला मुंबई येथील साकीनाका पोलिसांनी काल रात्री उशिरा चेन्नईमधून अटक केली.

या कालावधीत मुंबई पोलिसांनी नाशिक येथे अमली पदार्थाच्या कारखान्यात छापा टाकून कोट्यवधी रुपयांचा मेफेड्रोनचा साठा जप्त केला होता.

भागकर जाएगा कहां ?

ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. फरार आरोपी ललित पाटील याला कधी अटक करणार? असे विचारले असता, रितेश कुमार यांनी 'वह भागकर जाएगा कहां ?' असे म्हणत त्याला लवकरात लवकर अटक करू, असे सांगितले होते.

अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उध्वस्त

अमली पदार्थ तस्करी मुख्य आरोपी ललित पाटील याला चेन्नईतून अटक केली आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील पुणे पोलिसांनी ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे याच्यासह सात ते आठ आरोपींना अटक केली. अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उध्वस्त झाले आहे. भूषण आणि अभिषेक हे दोघे ड्रग्स तयार करत होते. तर ललित पाटील हा मार्केटिंग करीत होता. ललितला आज मुंबईत आणले जाईल. मुंबई पोलिसांकडून तपास झाल्यानंतर पुणे आणि नाशिक पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wakad Hinjewadi News : वाकड, हिंजवडीत अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांकडून कारवाईची मागणी!

Mutual Fund : काय आहे Active आणि Passive म्युच्युअल फंड? जाणून घ्या म्युच्युअल फंडमधील रिस्क आणि रिटर्न!

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

SCROLL FOR NEXT