Land mafia caught in CCTV for trying to seize land 
पुणे

Video : पुण्यात लँण्ड माफीयांचा जमीन बळकवण्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जमीन बळकवण्याचा लँण्ड माफीयांचा प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. या सीसीटिव्ही फुटेजमध्ये, एक मिनी टेम्पो सीसीसीटीव्हीच्या खांबाला धडकताना दिसतोय. मात्र, हा अपघात नाही तर, सीसीटीव्ही बंद करण्यासाठी जाणीवपूर्वक दिलेली धडक आहे. जमीनीवर पडल्यानंतरही सीसीटीव्हीने आपले काम सुरु ठेवले. त्यामुळे या टेम्पोचा पुढील धुडगुस ही सीसीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील औंधमध्ये चार दुकानात चोरी

धडका देऊन हा टेम्पो थांबला नाही तर, त्या जागेला केलेले कंपाऊंड पाडताना दिसत आहे. या टेम्पोने एक नाही तर अनेकदा धडका देऊन हे कंपाऊंड पाडले.  त्यानंतर या टेम्पोने याठिकाणी राहत असलेल्या कामगारांची घरे देखील पाडली असल्याचा आरोप जागा मालक गवारे आणि तक्रारदार छाया कांबळे यांनी केला आहे. 

पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात दोन तरूण ठार
पुण्यातील लोहगाव येथे हा प्रकार घडला आहे. गावगुंड आणि लँण्ड माफीयांनी जमीन बळकवण्यासाठी केलेला हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही मुळे उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. मात्र पोलीसांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही.''बेभान झालेल्या टेम्पोखाली कोणाच्या जीवाचे बरे-वाईट झाले असते तरच, पोलिसांनी दखल घेतली असती का?'' असा प्रश्न तक्रारदार छाया कांबळे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी कांबळे यांनी प्रताप खांदवे, प्रीतम खांदवे आणि सलीम मुलानी यांच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तिकिट तपासून घ्या; पु्ण्यात बस कंडक्टर करतायत अशी फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT