bhor fire 
पुणे

भोरमधील फिल्टर कंपनीचे आगीत पहा काय झाले... 

किरण भदे

नसरापूर (पुणे) : भोर तालुक्यातील वरवे खुर्द येथील वॅटस फिल्ट्रेशन टेक्नोलाॅजी कंपनीस गुरुवारी (ता. 11) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये कंपनीचे साधारण पावणेदोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनीचे मालक शितल वतुरकर यांनी दिली आहे.

याबाबत कंपनीचे सुरक्षा रक्षक माउली गोविंद ननावरे यांनी राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली. गुरुवारी कंपनीस साप्ताहीक सुट्टी होती. या दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या मुख्य शेडमध्ये आग लागल्याचे सुरक्षा रक्षक ननावरे यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत कंपनीच्या मालकांना माहिती दिली. दरम्यान वरवे खुर्द ग्रामस्थांनादेखिल या वेळी माहिती मिळाली. त्यानंतर राजगड पोलिस ठाण्यास याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर भोर व कात्रज येथील अग्निशमन दलाच्या चार गाड्या बोलावण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांबरोबर वरवे खुर्द ग्रामस्थांनी देखिल आग विझवण्याचा प्रयत्न केला. रात्री दोन ते तीन वाजता आग शांत झाली.

या कंपनीमध्ये इंडस्ट्रीयल फिल्ट्रेशनचे युनीट तयार केले जाते. आगीमध्ये अनेक फिल्टर व विशेष मशिनरी, कपंनीचे मोठे लोखंडी शेड, पत्रे यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले ऩाही. मात्र, शाॅर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राजगड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली असुन गावकामगार तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

Marathi News Live Updates : जांभूळवाडी दरी पुलावर मध्यरात्री भीषण अपघात; चारचाकीचा चक्काचूर, ट्रक पलटी

SCROLL FOR NEXT