Two women injured in Accident PMP bus due to brake Fail at Paud Road Pune
Two women injured in Accident PMP bus due to brake Fail at Paud Road Pune 
पुणे

'पॅनियल सायनस'वर लेसरद्वारे उपचार

सकाळवृत्तसेवा

पुणे : एकाच जागी बसून तासन्‌तास अभ्यास करणारे स्पर्धा परीक्षेचे अथवा "सेट-नेट'ची तयारी करणारे विद्यार्थी असोत की, सलग तीन-चार तास खुर्चीवर बसून काम करणारा नोकरदार यांच्यात 'पॅनियल सायनस' आजाराचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. या आजारावर प्रभावी उपचाराचे तंत्र पुण्यातील डॉक्‍टरांनी शोधले असून, त्याचे प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत करण्यात आले.

"इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कोलो प्रोक्‍टोलॉजी'ची जागतिक परिषद नुकतीच हैदराबादमध्ये झाली. जगभरातील सातशेहून अधिक तज्ज्ञ डॉक्‍टर त्यात सहभागी झाले होते. या परिषदेत "हिलिंग हॅन्ड्‌स क्‍लिनिक'चे प्रोक्‍टोलॉजिस्ट सर्जन डॉ. आश्‍विन पोरवाल यांनी शोधनिबंध सादर करून "पॅनियल सायनस' या आजारावरील "लेसर पिलोनीडोटॉमी' हे नवे तंत्र सादर केले.

काय आहे आजार?
एकाच जागी तासन्‌तास बसल्याने पाठीला घाम येतो. मणक्‍याच्या खाली माकडहाडामध्ये पोकळी तयार होते. त्यात हळूहळू केसांचा गुंता होतो. त्या गुंत्यात जंतूसंसर्ग होण्यास सुरवात होते. पुढे या संसर्गात वाढ होऊ लागते. या आजाराला वैद्यकीय परिभाषेत 'पॅनियल सायनस' म्हणतात.

उपचाराचे नवे तंत्र
'पॅनियल सायनस'वर उपाय म्हणून शस्त्रक्रिया हा पर्याय कालबाह्य झाला आहे. शस्त्रक्रियेऐवजी लेसरचा प्रभावी वापर करून या जंतूसंसर्ग बरा करण्याचे नवे तंत्र पुण्यातील प्रोक्‍टोलॉजिस्ट आणि सर्जन डॉ. आश्‍विन पोरवाल यांनी शोधले. "पॅनियल सायनस' या आजारावरील 'लेसर पिलोनीडोटॉमी' या नावाचे तंत्र आता जगभरातील विविध तज्ज्ञांपर्यंत पोचले आहे.

असे केले संशोधन
या संशोधनासाठी 180 रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला असून, त्यातील निष्कर्ष शोधनिबंधात मांडले आहेत. पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीत शस्त्रक्रिया करून टाके घालण्यात येत होते. यामुळे रुग्णांना काही आठवडे पोटावर झोपावे लागत होते. याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असे. तसेच, पुन्हा आजार बळावण्याची शक्‍यता असे. पारंपरिक शस्त्रक्रिया पद्धतीऐवजी लेसरचा वापर करून त्या पोकळीतील केस जाळतात. त्यामुळे त्या ठिकाणी तयार झालेला खड्डा बंद होतो. परिणामी, लेसरचे उपचार झाल्यानंतर रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. तसेच, दैनंदिन कामे करू शकतो. रुग्णाला टाके घालावे लागत नाही.

यांना होतो आजार
15 ते 20 वयातील 50 टक्के विद्यार्थ्यांना
35 ते 50 वयातील 20 टक्के नोकरदारांना

"पॅनियल सायनस'वर "लेसर पिलोनीडोटॉमी' (एलपीटी) हे नवे तंत्र विकसित करण्यात यश आले आहे. हे तंत्र जागतिक परिषदेत सादर करण्यात आले. त्यातून हे तंत्र जगातील तज्ज्ञांपर्यंत पोचले असल्याने त्यातून रुग्णसेवेची गुणवत्ता वाढेल.
- डॉ. आश्‍विन पोरवाल, प्रोक्‍टोलॉजिस्ट, "हिलिंग हॅन्ड्‌स क्‍लिनिक'
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT