last shravan monday 2023 bhimashankar temple devotee crowd for darshan culture Sakal
पुणे

Shravan Somvar 2023 : हर हर महादेव... श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी 'भीमाशंकर ज्योर्तिर्लिंग' दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पहाटे साडेचार ते पाच या वेळा मध्ये श्री क्षेञ भीमाशंकर महापुजा व आरती भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष विश्वस्त पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

- संतोष जाधव

भीमाशंकर : 'जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय,हर हर महादेव असा घोष करत मुसळधार पावसामध्ये श्रावण महिन्याच्या शेवटच्या व चौथ्या सोमवारी अडीच लाख भाविकांनी पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.

श्री क्षेञ भीमाशंकर हे बाराज्योर्तीर्लिंगापैकी सहावे ज्योर्तिर्लिंग आहे दरवर्षी श्रावणी महिन्यामध्ये विशेषत: दर सोमवारी देशाच्या कानाकोप-यातुन लाखो भाविक व पर्यटक येत असतात.परंतु श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी तिसर्‍या व चौथ्या श्रावणी सोमवारी काही प्रमाणात कमी गर्दी पहावयास मिळते.

परंतु चालु वर्षी ह्या दोन्ही सोमवारी गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे पहावयास मिळत आहे. याही वर्षी चौथ्या सोमवार निमित्त शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी साठी भाविकांनी राञी बारा वाजे पासुनच दर्शन रांगेत उभे होते.

नियमानुसार पहाटे साडेचार ते पाच या वेळा मध्ये श्री क्षेञ भीमाशंकर महापुजा व आरती भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष विश्वस्त पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली.भीमाशंकर देवस्थानच्या वतीने शिवलिंग व गाभारा आठशे किलो झेंडु, अस्टर, चमेली, शेवंती, डिजी, गुलछडी, अशा विविध रंगांच्या फुलांचा वापर करुन सभामंडप सजविण्यात आला होता.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास महापुजा व आरती झाल्यावर सुमधुर असा शंखनाद व डमरु वाद्य व झांज ह्याच्या आरती वाद्यांमुळे भीमाशंकर व परिसर दुमदुमुण गेला. दुपार नंतर भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केली.यामुळे आलेल्या भाविकांची चांगलीच तारंबळ उडाली.चौथा व शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे व्ही आय पी यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सौंदर्य फुलले आहे यामुळे भीमाशंकरला येणारे भाविक पर्यटक हे डिंभे धरण, गोहे घाट, तसेच ठिक ठिकाणे थांबुन निसर्गाचा आनंद लुटत होते. वाहतुकीला सोपे व्हावे यासाठी प्रशासनाकडुन पाच वाहनतळ ठेवण्यात आले होते.

परंतू गर्दीचा ओघ बघता सर्व वहाने ही चौथ्या व पाचव्या थांब्याजवळ पार्क करण्यात आली होती. थांब्यापासुन भाविकांना बसस्थानकापर्यंत सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या १४ मिनीबस व २० मोठ्या बस ठेवण्यात आल्या होत्या.यामुळे भाविकांना फार वेळ थांबावे लागत नव्हते. शिवाजीनगर (पुणे) दर आर्ध्या तासाला जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.

या वेळी आमदार महेश लांडगे,भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.सुरेश कौदरे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्ञी गवांदे विश्वस्त रत्नाकर कोडीलकर, दत्ताञय कौदरे, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे, महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, व यांच्या पत्नी शालिनी ताई विखे, खासदार राजन विचारे, वनमंञी सुधिर मुंनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे सचिन आहेर यांनी पविञ शिवलिंगाचे दर्शन घेतले घेतले.

पोलिस अधिक्षक अंकीत गोयल व उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसर तर घोडेगाव पोलिस स्टेशनच्यावतीने एक ते पाच नंबर पार्कींग तसेच बसस्थानक परिसरामध्ये बंदोबस्त नेमण्यात आला होता. भाविकांची गैरसोय होवु नये यासाठी मंदीर देवस्थान व प्रशासन यांच्याकडुन वेळोवेळी नियोजन केले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT