पुणे - राज्य शासनाकडून पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेतून माझ्या शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता जानेवारी महिन्यात मिळाला, पण गत वर्षीचा १५ हजाराचा दुसरा हप्ता नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी मिळाला नाही, एमएससी करणारा नागेश चव्हाण सांगत होता.
राज्य सरकारकडून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, पोस्ट मॅट्रिक स्काॅलरशीप योजनेतून खुल्या व मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी शिक्षण शुल्क समितीने महाविद्यालयांच्या शुल्कानुसार शिष्यवृत्तीची रक्कम निश्चीत केली जाते. त्यानंतर त्यांच्या थेट खात्यात पैसे जमा होते. यासाठी महाविद्यालय सुरू झाले की आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाते. २०१९-२० मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते त्यांना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ४ हजार रुपयांचा हप्ता मिळाला होता. त्यानंतर साधारणपणे मे महिन्यापर्यंत उर्वरीत १५ हजार रुपये बँक खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र, सप्टेंबर महिना सुरू झाला तरी अजून पैसे जमा झाले नाहीत.
नागेश चव्हाण म्हणाला, "खुल्या आणि एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता मिळाला आहे. पण आमचा दुसरा हप्ता मिळाला नाही. यासाठी डीबीटी पोर्टलवर अनेकदा तक्रारी केल्या त्यावर केवळ लवकरच शिष्यवृत्ती जमा होईल असेच उत्तर मिळत आहे.
असाच अनुभव ऋषी राऊत यालाही आलेला आहे. आमचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, विद्यार्थ्यांना या वर्षीचे शुल्क भरायचे आहे, असे असताना गेल्यावर्षीचाच हप्ता मिळाला नाही, तो लवकर जमा झाला पाहिजे."
एसईबीसी, ओबीसी, व्हिजीएनटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा दुसरा हप्ता जमा झालेला नाही. पालक आर्थिक अडचणीत असताना समाजकल्याण विभागाने त्वरीत रक्कम जमा करणे आवश्यक होते. यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले आहे, असे स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा चौगुले यांनी सांगितले.
समाजकल्याण आयुक्त प्रविण दराडे म्हणाले, "सर्व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे. दुसरा हप्त्याचे पैसे ही जमा झाले आहेत."
विद्यार्थी मारतात खेटे
समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांचे पैसे वाटप झाले असे सांगितले जात असले तरी अद्याप अनके विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता मिळालेला नाही. त्यासाठी ते समाजकल्याण आयुक्तालय, सह आयुक्त कार्यालयात खेटे मारत आहेत, आॅनलाईन तक्रारी करत आहेत. तसेच दुसरा हप्ता अनेक विद्यार्थ्यांना मिळालेला नसल्याचेही एका अधिकार्यांनी खासगीत मान्य केले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिजीएनटी, ओबीसी, एसईबीसी प्रवर्गातील
अर्ज केलेले विद्यार्थी - ९९,१९८
मान्यता मिळालेले विद्यार्थी - ७६,९४०
लाभार्थी विद्यार्थ्यांना रक्कम वाटप - ११ कोटी ७६ लाख
संस्थांना वाटप केलेली रक्कम - १८० कोटी ५ लाख
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.