Launch of new 40 Covid Bed Covid 19 Center in Katraj
Launch of new 40 Covid Bed Covid 19 Center in Katraj अशोक गव्हाणे
पुणे

पुण्यात चक्क हॉटेलमध्ये सुरू केले कोविड सेंटर, वाचा कुठे?

अशोक गव्हाणे

पुणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात बेडसची कमतरता भासत आहे. यामुळेच पुण्यात चक्क एका हॉटेलचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.शहरात असणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना हॉस्पिटल, बेड,ऑक्सिज,व्हेंटिलेटर बेड तसेच औषध सुविधा मिळवण्यासाठी तासन् तास वाट पाहत बसावे लागत आहे. मात्र शहरातील अनेक सामाजिक संस्थाच्या पुढाकारातून काही ठिकाणी मोफत तर काही ठिकाणी पैसे घेऊन कोविड सेंटर उभारले जात आहेत. पुण्याच्या कात्रज परिसरात असलेल्या रॉयल इन या हॉटेलमध्ये रुग्णासाठी कोविड सेंटर बनवण्यात आले आहे. खाजगी डॉक्टर, स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जवळपास ८० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ४० ऑक्सिजन आणि ४० विलगीकरणं बेड करण्यात आली आहेत. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या आशा प्रकारची व्यवस्था करणं गरजेच असल्याचं बोललं जातंय

शहरातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता कात्रज परिसरात नवीन सातारा रोडवर चौघूले वर्कशॉप शेजारी, गंधर्व लॉन्सच्या समोर नवीन कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचे उद्धाटन आज (ता. १५) महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. कात्रजमधील साई स्नेह हॉस्पिटलच्या वतीने हे कोविड सेंटर उभारण्यात आले असून यामध्ये ४० ऑक्सिजन व ४० क्वारंटाईन बेडची सोय करण्यात आली आहे.

स्थानिक नगरसेवक वसंत मोरे, साई स्नेह रुग्णालयाचे डॉ. सुनिल जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून हे खूप मोठे काम कात्रज परिसरात उभे राहिले आहे. आम्ही सर्वजण एकत्र आहोत, आणि या कोविड सेंटरसाठी कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही हे व्यासपीठावर असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीवरून तुमच्या लक्षात येईल, असे महापौर मोहोळ यावेळी म्हणाले. सर्वजण मिळून कोरोनाच्या संकटाचा सामना करू, या कोविड सेंटरमध्ये पेशंटना येण्याची वेळ येऊ नये, आणि कोरोनाचे संकट दूर व्हावे अशा शुभेच्छा यावेळी देतो, असे सांगताना शहराचा प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी कुठलीही अडचण पडू देणार नाही अशी ग्वाही मोहोळ यांनी दिली.

रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळित व्हावा ही आमची मागणी असल्याचे वसंत मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले. डॉ. सुनील जगताप, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, मनसे नेते मंगेश रासकर, आनंद अगरवाल, संदीप दगडे, अमरजित सिंग राजपाल, अॅड. भारत कदम, टेकावले काका आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुमीत जगताप यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT