अक्कलकोट : अक्कलकोटजवळील शिवपुरी आश्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी व्याहृति होम करून अग्निहोत्राची माहिती घेतली. शिवपुरी आश्रमाच्यावतीने डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले परिवाराने त्यांचे स्वागत व सत्कार केले.
डॉ. मोहन भागवत यांचे येथील शिवपुरी आश्रमात आज सकाळी अकराच्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी शिवपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले, डॉ. गिरिजा राजीमवाले, देवयानी राजीमवाले, देव राजीमवाले यांनी डॉ. भागवत यांचे स्वागत केले. त्यानंतर लगेचच व्याहृति होम करून परमसद्गुरु गजानन महाराज यांच्या पादुकांचे त्यांनी दर्शन घेतले.
तसेच शिवपुरी येथील श्री शिवानंद योगीन्द्र महाराज, भगवती सोनामाता, देवदेवेश्वर भगवान परशुराम मंदिरांचे दर्शन घेऊन डॉ. पुरुषोत्तम महाराज यांच्यासोबत जागतिक पातळीवर मानव कल्याणकारी अग्निहोत्र आणि सनातन धर्म या विषयावर सविस्तर चर्चा केली.
त्यावेळी त्यांनी आनंद व्यक्त करत परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यावेळी शिवपुरी आश्रमाचे सचिव अण्णा वाले, सुधीर कुलकर्णी, सिद्धार्थ आपटे, वक्रतुंड औरंगाबादकर, गणेश थिटे, धनंजय वालुंजकर, सुरेंद्र तेलंग,
पवन कुलकर्णी, पद्मनाभ गुरुजी, जोशी गुरुजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक यशवर्धन वाळिंबे, विभाग प्रचारक मंगेश बडवे, जिल्हा प्रचारक सुशांत पांडकर, तालुका कार्यवाह चेतन जाधव, तालुका संघचालक रवी जोशी, संतोष वगाले, यश कुलकर्णी आदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते.
शिवपुरी आश्रमामध्ये डॉ. मोहन भागवत व शिवपुरी आश्रमाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्यात विविध विषयावर चर्चा सुरू असताना डॉ. राजीमवाले यांनी दैनिक ‘सकाळ’च्या ‘श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम’ संदर्भात डॉ. भागवत यांना माहिती दिली. ‘श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम’ संदर्भात दोन्ही मान्यवरांनी ‘सकाळ’च्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.