भावाला अकादमीत पोहोचवण्यासाठी घरातून निघाला, वाटेत मृत्यूने गाठले sakal
पुणे

भावाला अकादमीत पोहोचवण्यासाठी घरातून निघाला, वाटेत मृत्यूने गाठले

अल्पवयीन मुलाचा मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

रामवाडी : खराडी (kharadi) येथे (काल ता .10 ) दुचाकी व कार यांची धडक झाल्याने आर्य विनोद गलांडे वय 17 रा .बॉम्बे सँपर्स कॉलनी वडगावशेरी, या मध्ये अल्पवयीन मुलाचा मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (left home brother academy but died on way kharadi)

काल दुपारी साडेतीन वाजता आर्य गलांडे दुचाकी वरुन आपल्या लहान भावाला वेदांत गलांडे (वय 12) ह्यास क्रिकेट अकॅडमी ठिकाणी पोहोचविण्यासाठी झेंन्सार कडून ईऑन आयटी पार्क येथून जात होता. याच वेळी मर्सिडीज कार ( नंबर MH 42 Y 5423 ) हिच्या दुरुस्ती नंतर ट्रायल घेण्यासाठी गॅरेज मालक रोहित अनिल दळवी (वय 22 रा.मुंढवा) हे खराडी चौकातून झेंन्सार कडे जात होते. त्यांची समोरासमोर धडक झाल्याने कारचा धक्का लागल्याने ही दोन्ही मुले खाली पडली यामध्ये आर्य यांच्या छातीला जोरदार मार लागला.

तर वेदांत याला पायाला मुका मार लागला तर डाव्या हाताला खरचटले. खराडी पोलीस चौकीचे पोलीस व नागरिकांनी विलंब न करता या दोन्ही मुलांना कोलंबिया हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले. तपासणी नंतर आर्य गलांडे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. कार चालकांविरुद्ध चंदननगर पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर माहिती चंदननगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT