Leopard esakal
पुणे

बेल्ह्यात थरार ; बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

कोंबरवाडी- बेल्हे (ता. जुन्नर) येथील कुंजीरमळा परिसरात मंगळवारी (ता. ११) सकाळी उसाला पाणी देत असताना गोविंद कारभारी कुंजीर (वय ५२) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या वेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला.

सकाळ डिजिटल टीम

बेल्हे : कोंबरवाडी- बेल्हे (ता. जुन्नर) येथील कुंजीरमळा परिसरात मंगळवारी (ता. ११) सकाळी उसाला पाणी देत असताना गोविंद कारभारी कुंजीर (वय ५२) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या वेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कोंबरवाडी येथे कुंजीरमळा परिसरात मंगळवारी (ता. ११) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोविंद कुंजीर हे आपल्या शेतात उसाला पाणी देत होते. त्यावेळी उसाच्या सरीजवळ वाढलेला ऊस पडू नये म्हणून एकीकडे हाताने दाबत असताना समोर गुरगुरण्याचा आवाज आल्याने ते सावध झाले.

दरम्यान, शेताच्या बांधाजवळील पाण्याच्या बारण्याकडून समोरून आलेल्या बिबट्याने कुंजीर यांच्यावर गुरगुरत पंजा मारून हल्ल्याचा प्रयत्न केला. या वेळी बिबट्याच्या पंज्याच्या नख्यांमुळे त्यांचे शर्ट उजव्या हाताजवळ फाटले. तर, बिबट्याचा दुसरा पंजा त्यांच्या डाव्या हातात आला. या वेळी त्यांनी जोरात आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी धाऊन आले. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला.

बिबट्याच्या पंज्याच्या नख्या त्यांच्या हाताला ओरखडल्याने किरकोळ जखम झाली आहे. बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : दूधगंगा नदीपात्रात आंघोळीला गेलेल्या जिल्हा बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यावर मगरीचा जबरदस्त हल्ला; पायाला धरुन पाण्यात ओढत नेलं अन्...

दिल्लीसारखीच मुंबईची हवा प्रदूषित, श्वास घेणंही कठीण, BMC कडून 'या' कामांवर तात्पुरती बंदी, AQI नेमका किती?

Nita Ambani Video: नीता अंबानींचा स्टाफ मेंबरसाठी वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल, यूजर्संनी दिल्या खास प्रतिक्रिया

World AIDS Day 2025: 'ओरल सेक्स'मधूनही एचआयव्ही पसरू शकतो? AIDS संबंधीचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

Gondia Crime : वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; अचानक झडप मारली अन्…

SCROLL FOR NEXT